Disha Vakani: जेव्हा ऐश्वर्या रायच्या खांद्यावर डोकं ठेवून ढसाढसा रडू लागली ‘दयाबेन’, कारण…
Disha Vakani: ऐश्वर्या राय हिच्या खांड्यावर डोकं ठेवून ढसाढसा का रडू लागली 'दयाबेन'? फोटो पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल..., दयाबेन म्हणजे अभिनेत्री दिशा वकानी गेल्या काही दिवसांपासून संसारात व्यस्त
टीव्ही विश्वातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री दिशा वकानी गेल्या काही वर्षांपासून अभिनय विश्वापासून दूर आहे. लग्न झाल्यानंतर दिशा हिने दोन मुलांना जन्म दिला आणि आता अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यात व्यस्त झाली आहे. पण एक काळ असा होता, जेव्हा दिशा वकानी हिच्या सर्वत्र चर्चा असायच्या. ‘तारक मेहता का उल्ट चष्मा’ मालिकेमुळे दिशा हिच्या चहत्यांच्या संख्येत मोठी झाली. पण मुलांच्या जन्मानंतर अभिनेत्री मालिकेचा निरोप घेतला. पण आजही चाहते मालिकेत दयाबेनची प्रतीक्षा करत आहेत.
दिशा वकानी हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने फक्त मालिकांमध्येच नाही तर, सिनेमांमध्ये देखील काम केलं आहे. ‘जोधा अकबर’ सिनेमात देखील दिशा हिने महत्त्वाची भूमिका साकारली होती. 2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जोधा अकबर’ सिनेमात अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता हृतिक रोशन यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती.
सिनेमात दिशा हिने राणी असलेल्या जोधा म्हणजे ऐश्वर्या हिच्या मैत्रीण माधवीची भूमिका साकारली होती. सिनेमातील एक फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फोटोमध्ये दिशा, ऐश्वर्या हिच्या खांद्यावर डोकं ठेवून ढसाढसा रडताना दिसत आहे. सध्या सर्वत्र दोघींच्या फोटोची चर्चा रंगली आहे.
सिनेमाच्या कथेनुसार, ऐश्वर्या लग्न झाल्यानंतर सासरी निघते तेव्हा भावनिक करणाऱ्या सीनचा एका फोटो तुफान व्हायरल होत आहे. सांगायचं झालं तर, आज दिशा वकानी हिचा वाढदिवस असल्यामुळे सर्वत्र दिशा वकानी हिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याची चर्चा रंगली आहे.
दिशा वकानी हिच्या करियरबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने रंगभूमीपासून सुरुवात केली. दिशा हिने गुजराती सिनेविश्वात देखील अनेक वर्ष काम केलं. 1997 मध्ये दिशा हिने मोठ्या पडद्यावर देखील काम केलं. पण अभिनेत्रीला यश मिळालं नाही. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेमुळे अभिनेत्री एका रात्रीत प्रसिद्धी झोतात आली.
दिशा वकानी हिचं खासगी आयुष्य…
दिशा वकानी हिने 2015 मध्ये 24 नोव्हेंब 2015 मध्ये लग्न केलं. अभिनेत्री उद्योजक मयूर पाडिया यांच्यासोबत कुटुंबियांच्या इच्छेने लग्न केलं. मयूर आणि दिशा यांना दोन मुलं आहेत. 2017 मध्ये दिशाने लेकीला जन्म दिला. त्यानंतर 2022 मध्ये गोंडस मुलाला जन्म दिला. दिशा कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.