TMKOC | अय्यर किंवा जेठालाल नाही तर ‘हा’ बबिताचा लहानपणीचा क्रश; मुनमुन दत्ताकडून खुलासा

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत बबिताची भूमिका साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ताची सोशल मीडियावर लिहिलेली पोस्ट चर्चेत आली आहे. या पोस्टमध्ये तिने तिच्या लहानपणीच्या प्रेमाचा उल्लेख केला आहे.

TMKOC | अय्यर किंवा जेठालाल नाही तर 'हा' बबिताचा लहानपणीचा क्रश; मुनमुन दत्ताकडून खुलासा
Munmun DuttaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 16, 2023 | 12:33 PM

मुंबई | 16 सप्टेंबर 2023 : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील बबीताजी म्हणजेच अभिनेत्री मुनमुन दत्ता हे घराघरातील परिचयाचं नाव आहे. मालिकेत मुनमुनने अय्यरच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. मात्र जेठालाल आणि बबीताजी यांचं समीकरण हे वेगळंच आहे. सोशल मीडियावरही बबीता आणि जेठालाल यांच्यावरून हास्यस्पद मीम्स व्हायरल होताना दिसतात. मात्र खऱ्या आयुष्यात बबीताचा लहानपणीचा क्रश कोण आहे, हे तुम्हाला माहित आहे का? नुकतंच तिने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहित याचा खुलासा केला. बबीताच्या या नव्या पोस्टवर चाहत्यांकडून लाइक आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

सध्या बॉक्स ऑफिसवर एकाच चित्रपटाची जोरदार चर्चा आहे, तो म्हणजे शाहरुख खानचा ‘जवान’. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. अगदी पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांनी थिएटरमध्ये तुफान गर्दी केली. आता ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील अभिनेत्री मुनमुन दत्ता उर्फ बबीताजीनेही शाहरुखचा हा ब्लॉकबस्टर चित्रपट पाहिला आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर तिने सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली आहे.

हे सुद्धा वाचा

इंस्टाग्रामवर मुनमुनने ‘जवान’च्या पोस्टरसोबतचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलं, ‘जवानसाठी टाळ्या. मी रडले, हसले, नाचले आणि थिएटरमधून बाहेर पडताना माझ्या चेहऱ्यावर हास्य होतं. त्याचसोबत हा अभिमान मनात होता की मी शाहरुख खानची चाहती होती, आहे आणि कायम राहीन. जवान हा चित्रपट खरंच खूप मनोरंजक होता. इतक्या अभिनेत्रींना घेऊन एक परफेक्ट स्टोरी मोठ्या पडद्यावर मांडण्याचं काम फक्त इंडस्ट्रीतला महत्त्वपूर्ण व्यक्तीच करू शकतो आणि तो म्हणजे शाहरुख खान. दिग्दर्शन, ॲक्शन आणि अटलीने दाखवलेला साउथचा तडका अप्रतिम होता. यापेक्षा चांगलं आणखी काही बनूच शकत नाही. मी नक्कीच हा चित्रपट पुन्हा एकदा पाहायला जाईन.’

मुनमुनने याच पोस्टमध्ये तिच्या बालपणीच्या क्रशचाही उल्लेख केला. तिने पुढे लिहिलं, ‘शाहरुख खान हा माझा नेहमीच बालपणीचा क्रश राहील. माझ्यासाठी तो एक असा हिरो आहे, ज्याचा आदर्श मी गेल्या अनेक वर्षांपासून घेत आले आहे. त्याच्यासोबत काम करण्याची, त्याला भेटण्याची संधी मिळाल्यापासून मी हे खात्रीने म्हणू शकते की त्याच्यासारखा कोणीच नाही. तो एकमेव आहे.’ शाहरुखने ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत दोनदा हजेरी लावली होती. एकदा ‘चेन्नई एक्स्प्रेस’ या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त तर दुसऱ्यांदा ‘हॅप्पी न्यू इयर’ या चित्रपटासाठी तो या मालिकेत आला होता.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.