TMKOC | …आणि पत्नी दयाबेनला ‘ए पागल औरत’ म्हणणं ‘जेठालाल’ला महागात पडलं! वाचा किस्सा…

सोनी सब वाहिनीवरील टीव्ही सीरियल ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ (Taarak Mehta Ka ooltah Chashmah) बर्‍याच वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. गेल्या 13 वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांची मने जिंकत आहे.

TMKOC | ...आणि पत्नी दयाबेनला ‘ए पागल औरत’ म्हणणं ‘जेठालाल’ला महागात पडलं! वाचा किस्सा...
दिलीप जोशी
Follow us
| Updated on: May 05, 2021 | 10:23 AM

मुंबई : सोनी सब वाहिनीवरील टीव्ही सीरियल ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ (Taarak Mehta Ka ooltah Chashmah) बर्‍याच वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. गेल्या 13 वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांची मने जिंकत आहे. या शोच्या प्रत्येक पात्राने लोकांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मग ते ‘जेठालाल’ची भूमिका करणारे दिलीप जोशी असोत किंवा ‘दयाबेन’ची भूमिका करणारी दिशा वाकानी असो. सर्व कलाकारांनी देखील लोकांची मने जिंकली आहेत. मात्र, एकदा हा कार्यक्रम एका मोठ्या वादात देखील अडकला होता. या वादाला कारणीभूत ठरला होता जेठालाल यांचा एक संवाद….(Taarak Mehta Ka ooltah Chashmah controversial dialogue story)

या मालिकेतील कलाकाराच नव्हेतर त्यांचे संवाद देखील तितकेच लोकप्रिय आहेत. शोमध्ये यापूर्वी दिलीप जोशी अर्थात ‘जेठालाल’ हे पात्र ‘ए पागल औरत’ असा संवाद बोलत असत. मात्र, त्यांच्या या संवादांमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. ज्यानंतर तो शोमधून काढून टाकण्यात आला. जेठालालची भूमिका करणारे दिलीप जोशी यांनी या कॉन्ट्रोवर्सीबद्दल सांगितले होते. नंतर हा संवाद दुरुस्त केला गेला.

संवादच बदलला…

‘तारक मेहता’चे मुख्य कलाकार अभिनेता दिलीप जोशी यांनी सांगितले होते की, ‘ए पागल औरत’ हा जो संवाद आहे, तो मी नंतर पूर्ण बदलला. कारण तशीच एक परिस्थिती सेटवर आली होती. सीन करत असताना सेटवर एक अशी परिस्थिती निर्माण झाली की दया त्यात लगेच प्रतिक्रिया देते आणि मी हे दृश्य करत असतानाच, माझ्या तोंडातून ‘ए पागल औरत’ असे बाहेर शब्द बाहेर पडतात. याचा अर्थ असा होता की, दय तू काहीही बोलत आहेस. परंतु नंतर काही स्त्रियांनी त्या संवादावर खूप आक्षेप घेतला आणि मला सांगण्यात आले की, हा संवाद पुन्हा वापरायचा नाही. मला स्वतःला देखील तो संवाद आवडला नव्हता.’(Taarak Mehta Ka ooltah Chashmah controversial dialogue story)

या मालिकेमध्ये दिलीप जोशी आणि दिशा वाकानीची जोडी खूपच पसंत केली गेली आहे. दिशा वाकानीला हा शो सोडून बराच काळ झाला आहे. शोमधून ती काही काळ ती प्रसूतीच्या रजेवर गेली होती. पण ती अजून परत आलेली नाही. चाहते तिच्या परत येण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. चाहते अनेकदा शोच्या मेकर्सना दयाबेनच्या परतीषयी विचारतात.

दया बेनच्या वापसीवर निर्माते म्हणतात…

एका प्रसिद्ध वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत असित मोदी यांना ‘दया बेन’ यांच्या परतीबद्दल प्रश्न विचारले गेले. त्यावर ते म्हणाले की, ‘मला वाटते की आता मीच दयाबेन झाले पाहिजे. अनेक वर्षांपासून दयाबेन यांच्या परतीबद्दल प्रश्न विचारण्यात येत आहेत.’ असित मोदी म्हणाले की, निर्माते दिशा वाकानीच्या परत येण्याची वाट पाहत आहेत, पण जर अभिनेत्रीने शो सोडण्याची इच्छा व्यक्त केली तर शो नवीन दयाबेन सोबत पुढे जाईल. आम्ही अजूनही तिच्या परतीच्या प्रतीक्षेत आहोत.’

(Taarak Mehta Ka ooltah Chashmah controversial dialogue story)

हेही वाचा :

TMKOC | ‘तारक मेहता’च्या चाहत्यांना वाट बघावी लागणार? ‘दया बेन’च्या वापसीवर प्रश्न विचारताच असित मोदी म्हणाले…

मनोरंजनाची मेजवानी मिळणार, मनोज बाजपेयीची ‘The Family Man 2’ सीरीज लवकरच प्रदर्शित होणार!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.