3 वर्षांपासून ऑडिशन सुरू, ती 100% दयाबेनच.. जेनिफर मिस्त्रीचा खुलासा
दिशाने 2017 मध्ये ही मालिका सोडली होती. बाळंतपणाच्या रजेवर गेलेली दिशा पुन्हा मालिकेत परतलीच नाही. तिला मालिकेत परत आणण्यासाठी दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी बरेच प्रयत्न केले. मात्र दिशा सध्या तिच्या खासगी आयुष्यावर लक्ष केंद्रीत करत असल्याचं म्हटलं गेलं.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील सर्वांत लोकप्रिया भूमिका म्हणजे दयाबेन. मात्र हीच भूमिका गेल्या अनेक वर्षांपासून या मालिकेतून गायब आहे. अभिनेत्री दिशा वकानी या मालिकेत दयाबेनची भूमिका साकारत होती. मात्र बाळंतपणासाठी तिने मालिकेतून ब्रेक घेतला आणि परतलीच नाही. दिशाला मालिकेत पुन्हा आणण्याचे अनेक प्रयत्न निर्मात्यांकडून झाले. मात्र तिने कुटुंबीयांना प्राधान्य देत मालिकेत परतण्यास नकार दिला. एकीकडे मालिकेत दयाबेनच्या कमबॅकची प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता असताना दुसरीकडे अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती दयाबेनच्या भूमिकेविषयी मोठा खुलासा करताना दिसतेय.
‘तारक मेहता..’चे निर्माते दयाबेनच्या भूमिकेसाठी गेल्या तीन वर्षांपासून एका मुलीचं ऑडिशन घेत असल्याचं जेनिफरने सांगितलं आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये ती म्हणते, “ती 100 टक्के दया आहे. एका बिचाऱ्या मुलीचा ते तीन वर्षांपासून ऑडिशन घेत आहेत. दिल्लीवरून तिला इथे बोलवतात. एक गोष्ट म्हणजे ती मुलगी तरुण आहे. ती 28-29 वर्षांची आहे. त्यामुळे वयातील फरक लगेच दिसून येईल. म्हणून तिची निवड होऊ शकत नाहीये. पण ती हुबेहूब दयासारखीच आहे. आमची तिच्यासोबत मॉक टेस्ट झाली होती. दिलीपजी आणि टप्पू सेना यांचंही वेगवेगळं मॉक शूट झालंय. त्या मुलीचा चेहरा वेगळा आहे, पण तयारी केल्यावर तुम्ही डोळे बंद कराल तेव्हा तुम्ही फरकच सांगू शकणार नाही.”
I know it’s far beyond saving….but le ayo yar byu/i-hades inTMKOC
हे सुद्धा वाचा
या मालिकेचे निर्माते असितकुमार मोदी यांनी विविध मुलाखतींमध्ये सांगितलं की ते नव्या दयाबेनच्या शोधात आहेत. मालिकेत दयाबेनच्या एण्ट्रीबाबतचा सीन अनेकदा दाखवण्यात आला, मात्र कधीच अभिनेत्रीची एण्ट्री झाली नाही. त्यामुळे अनेकदा प्रेक्षकांनीही नाराजी व्यक्त केली. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत दयाबेनची भूमिका साकारलेली अभिनेत्री दिशा वकानी घराघरात लोकप्रिय आहे. दिशाने बाळंतपणासाठी मालिकेतून ब्रेक घेतला होता. मात्र ती पुन्हा सेटवर परतलीच नाही. गेल्या सहा वर्षांपासून मालिकेचे निर्माते तिला परत आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. प्रेक्षकसुद्धा तिला परत आणण्याची जोरदार मागणी करत आहेत.