‘तारक मेहता…’ फेम गुरुचरण सिंग कधीच घरी परतणार नव्हता, अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : 25 दिवस बेपत्ता असलेला गुरुचरण सिंग याने सोडलं मौन, अभिनेता घरी कधीच परतणार नव्हता, बेपत्ता झाल्याचं देखील सांगितलं कारण, सध्या सर्वत्र गुरुचरण सिंग याची चर्चा... जाणून चाहत्यांना देखील बसला धक्का...
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेत मिस्टर सोढी या भूमिकेला न्याय देत अभिनेता गुरुचरण सिंग याने चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण जेव्हा अभिनेता बेपत्ता असल्याची माहिती समोर आली तेव्हा चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला. गुरुचरण बेपत्ता झाल्यानंतर अभिनेत्याच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दरम्यान, गुरुचरण याने फक्त लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी असं पाऊल उचलल्याचा आरोप करण्यात आला. आता अभिनेत्याने यावर मोठं वक्तव्य केलं असून, का बेपत्ता झाला? या चाहत्यांच्या प्रश्नाचं उत्तर देखील दिलं आहे.
अशात 25 दिवसांनंतर परत आल्यानंतर गुरुचरण सिंग याने पोलिसांना सांगितलं की, तो काही समस्यांशी झुंजत होता आणि आध्यात्मिक प्रवासाला निघाला होता. आता गुरुचरण मुंबईत आहे. अभिनेता म्हणाला, ‘महामारीनंतर अनेक गोष्टी बदलेल्या. 2020 मध्ये मी मुंबई सोडून दिल्लीला गेलो. कारण वडिलांची सर्जरी होती. मी स्वतःच्या हिंमतीवर अनेक व्यवसाय सुरु करण्याचा देखील प्रयत्न केला.’
‘व्यवसाय सुरु केले पण नफा झाला नाही. ज्या लोकांसोबत हात मिळवणी केली होती. त्यांनी देखील साथ सोडली आणि गायब झाले. गेल्या अनेक वर्षांपासून आमचे संपत्तीमुळे देखील वाद सुरू आहेत, त्यामध्ये देखील माझे पैसे खर्च झाले. कठीण काळात माझ्या आर्थिक स्थितीवर विपरीत परिणाम झाला आणि मी खूप अस्वस्थ झालो. ‘
‘माझ्या आई-वडिलांमुळे मी आध्यात्मिक आहे. माझ्या आयुष्यातील या टप्प्यावर जेव्हा मला नैराश्य येत होतं, तेव्हा मी देवाकडे वळलो. मी आध्यात्मिक प्रवासाला निघालो होतो आणि परत येण्याचा माझा कोणताही विचार नव्हता. पण देवाने मला एक संकेत दिला आणि त्यानेच मला घरी परतण्यास भाग पाडले.
अनेकांना असे वाटते की मी एका प्रसिद्धी स्टंटसाठी गायब होण्याची योजना आखली होती, परंतु त्यामध्ये काहीही तथ्य नाही. मला प्रसिद्धी हवी असते तर मी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ विरोधात मुलाखत दिली असती. कारण करार झाल्यानुसार मला माझे पैसे मिळाले नाहीत. असं करण्यासाठी मी सोशल मीडियाचा देखील वापर करु शकलो असतो. पण मी असं काहीही केलं नाही…’
‘घरी परतल्यानंतर देखील मी कोणाला मुलाखत दिली नाही. पण आता मला बोलून अनेक गोष्ट स्पष्ट करायच्या आहे. लोकं माझ्याबद्दल जो काही विचार करत आहेत, तसं काहीही नाही. मला आता मदत हवी आहे. मला काम करायचं आहे. मी ज्यांच्याकडून कर्ज घेतलं आहे, त्यांचे पैसे मला परत करायचे आहे, त्यासाठी मला कामाची गरज आहे… ‘ असं म्हणत अभिनेत्याने पुन्हा काम करण्याची इच्छा व्यक्त करत इंडस्ट्रीमधून मदत मागितली आहे.