TMKOC: ‘तारक मेहता..’मधील ‘चंपक चाचा’ यांना सेटवर दुखापत; नेमकं काय घडलं?

'तारक मेहता..'मधील 'चंपक चाचा' मालिकेतून काही दिवस घेणार ब्रेक; चाहत्यांकडून काळजी व्यक्त

TMKOC: 'तारक मेहता..'मधील 'चंपक चाचा' यांना सेटवर दुखापत; नेमकं काय घडलं?
Amit BhattImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Nov 18, 2022 | 7:44 AM

मुंबई: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय मालिका आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. यातील प्रत्येक कलाकाराने आपल्या दमदार अभिनयकौशल्याने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. या मालिकेत चंपक चाचाची भूमिका साकारणारे अभिनेते अमित भट्ट यांना सेटवर दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहे.

ई टाइम्स टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, ‘तारक मेहता..’ मालिकेच्या चंपक चाचा यांना दुखापतीनंतर डॉक्टरांनी पूर्णपणे आराम करण्याचा सल्ला दिला आहे. सध्या ते शूटिंग करू शकत नाही. या मालिकेतील एका दृश्यादरम्यान अमित भट्ट यांना पळायचं होतं. मात्र पळताना त्यांचा तोल गेला आणि ते पडले. पडल्यामुळे अमित यांना दुखापत झाली आहे. सध्या ते बेड रेस्टवर असून काही दिवस शूटिंगपासून लांब राहणार आहेत.

मालिकेच्या निर्मात्यांनीही त्यांना आराम करण्यासाठी सुट्टी दिली आहे. अमित यांना दुखापत झाल्याने सेटवरील इतर कलाकारसुद्धा त्यांच्यासाठी काळजी व्यक्त करत आहेत. ‘तारक मेहता..’ या मालिकेने काही दिवसांपूर्वीच 14 वर्षे पूर्ण केली आहेत. इतक्या वर्षांनंतरही या मालिकेची लोकप्रियता कमी झाली नाही.

हे सुद्धा वाचा

मालिकेतील चंपक चाचा आणि जेठालाल यांचे सीन्स चाहत्यांना खूप आवडतात. त्यांच्यातील संभाषण हे कधी पोट धरून हसवणारं तर कधी भावूक करणारं असतं. अमित भट्ट यांनी ‘तारक मेहता..’शिवाय ‘खिचडी’, ‘येस बॉस’, ‘चुपके चुपके’, ‘फनी फॅमिली डॉट कॉम’, ‘गपशप कॉफी शॉप’, ‘एफआयआर’ यांसारख्या मालिकांमध्येही काम केलंय. इतकंच नव्हे तर त्यांनी सलमान खानच्या मेव्हण्याच्या ‘लव्हयात्री’ या चित्रपटातही पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली आहे.

Non Stop LIVE Update
दिग्गज नेत्यांमध्ये कोणाचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
दिग्गज नेत्यांमध्ये कोणाचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
Election Result भाजप, महायुतीची लाट नाही तर त्सुनामी, मविआचा सुपडा साफ
Election Result भाजप, महायुतीची लाट नाही तर त्सुनामी, मविआचा सुपडा साफ.
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.