टप्पू-सोनूनंतर आता ‘या’ अभिनेत्याचाही ‘तारक मेहता..’ला रामराम? 16 वर्षांनंतर सोडली मालिका?

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतून आणखी एका कलाकाराची एक्झिट झाल्याची जोरदार चर्चा आहे. याविषयीची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका फॅन पेजवरील ही पोस्ट आहे. अभ्यासावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी या कलाकाराने मालिका सोडल्याचं कळतंय.

टप्पू-सोनूनंतर आता 'या' अभिनेत्याचाही 'तारक मेहता..'ला रामराम? 16 वर्षांनंतर सोडली मालिका?
तारक मेहता का उल्टा चष्माImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 20, 2024 | 4:31 PM

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका गेल्या 16 वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. आतापर्यंत या मालिकेत अनेक नवीन कलाकार आहे आणि जुने कलाकारांची एक्झिट झाली. मात्र कलाकार जुने असो किंवा नवीन.. प्रत्येक भूमिकेनं प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडली आहे. काही दिवसांपूर्वीच यामध्ये टप्पूची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याने मालिकेला रामराम केला. आता टप्पू सेनेमधील आणखी एका अभिनेत्याची मालिकेतून एक्झिट होणार असल्याचं कळतंय. ही भूमिका गोलीची असल्याचं समजतंय. एका फॅनपेजवर गोलीची भूमिका साकारणारा अभिनेता कुश शाहचा फोटो पोस्ट करण्यात आला आहे. ज्या व्यक्तीचं हे फॅनपेज आहे, त्याची कुश शाहसोबत अचानक भेट झाली होती. या भेटीदरम्यान त्याने न्यूयॉर्कमधील शिक्षण पूर्ण करण्यासाठी मालिका सोडणार असल्याचं सांगितलंय. यासंदर्भातील पोस्ट आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या पोस्टमध्ये लिहिलंय, ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या दिशेने जाताना माझी अचानक भेट कुश शाह उर्फ गोलीशी झाली. त्याने मला सांगितलं की त्याने ‘तारक मेहता..’ ही मालिका सोडली असून न्यूयॉर्कमध्ये तो शिक्षण पूर्ण करतोय.’ या पोस्टवर नेटकऱ्यांकडून प्रतिक्रियांचा वर्षाव होतोय. एका चाहत्याने लिहिलं, ‘आता तर या मालिकेत काहीच मनोरंजक राहिलं नाही. माझे सर्व आवडते कलाकार मालिका सोडून जातायत.’ तर दुसऱ्याने मालिका सोडण्याचा निर्णय कुशसाठी चांगला असल्याचं म्हटलंय.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Kush Shah (@iamkushshah_)

कुश शाहने खरंच मालिका सोडली का, याविषयी त्याने अद्याप कोणतीच अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही. मात्र मालिकेत त्याने त्याच्या विनोदाच्या अचूक टायमिंगने आणि परफॉर्मन्सने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्याने साकारलेली गोलीची भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडली आहे. आता मालिकेच्या पुढील भागात कुश दिसणार की नाही, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आतापर्यंत या मालिकेतून बऱ्याच कलाकारांची एक्झिट झाली आहे. यामध्ये दयाबेनची भूमिका साकारणारी दिशा वकानी, टप्पूची भूमिका साकारणारा राज अनाडकर, तारक मेहताची भूमिका साकारणारे शैलेश लोढा, सोनूची भूमिका साकारणारी झील मेहता यांचा समावेश आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.