रोशन सिंग सोढी बेपत्ता, शोधकार्य सुरु, 4 दिवसांपूर्वी केलेली पोस्ट पाहून व्हाल थक्क
Taarak Mehta ka Ooltah Chashmah | 'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम रोशन सिंग सोढी 4 दिवसांपासून बेपत्ता, चाहते कुटुंबिय चिंतेत, गायब होण्यापूर्वी अभिनेत्याने केलेली पोस्ट पासून व्हाल थक्क, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त लोकप्रिय अभिनेता गुरुचरण सिंग याची चर्चा
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेमध्ये रोशन सिंग सोढी ही भूमिका साकारत ज्या अभिनेत्याने चाहत्यांच्या मनावर राज्य तेलं तो अभिनेता गेल्या 4 दिवसांपासून बेपत्ता आहे. रोशन सिंग सोढी भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचं नाव गुरुचरण सिंग असं आहे. अचानक असं काय झालं ज्यामुळे अभिनेता गायब झाला? असे अनेक प्रश्न चाहत्यांच्या मनात उपस्थित होत आहेत. गुरुचरण यांचा शोध पोलीसही घेत आहेत. पण त्यांचा तपास अजून लागलेला नाही. गुरुचरण सिंग याच्या वडिलांनी त्यांच्या बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांकडे केली आहे. गुरुचरण बेपत्ता झाल्याची बातमी समोर आल्यापासून त्यांच्या चाहत्यांमध्ये आणि कुटुंबियांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.
गुरुचरण सिंग याच्या वडिलांनी त्यांच्या बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांकडे केल्यानंतर पोलिसांचं शोधकार्य सुरु झालं आहे. सांगायचं झालं तर, 4 दिवसांपूर्वी गुरुचरण सिंग याने वडिलांचा वाढदिवस साजरा केला होता. सोशल मीडियावर अभिनेत्याचा 4 दिवसांपूर्वीचा व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
व्हिडीओमध्ये गुरुचरण सिंग त्याच्या वडिलांसोबत आनंदी दिसत आहे. वडील देखील गुरुचरण सिंग याला आशीर्वाद देताना दिसत आहेत. अभिनेत्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. वडिलांसोबत खास व्हिडीओ पोस्ट करत अभिनेत्याने वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
गुरुचरण सिंग याच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता अनेक वर्ष ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेत काम करत होता. त्याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. पण एक दिवस असा आला जेव्हा अभिनेत्याने मालिकेचा निरोप घेतला. निर्मात्यांसोबत काही वाद झाल्यानंतर गुरुचरण सिंग याने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला.
मालिकेत काम केल्यानंतर मानधन उशिराने मिळत असल्यामुळे गुरुचरण सिंग याने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला… अशी चर्चा चाहत्यांमध्ये सुरु होती. पण एका मुलाखतीत खुद्द अभिनेत्याने मालिका सोडण्याचं कारण सांगितलं होतं. मी जेव्हा मालिका सोडली तेव्हा माझ्या वडिलांची शस्त्रक्रिया होणार होती. काही गोष्टी होत्या, ज्याबद्दल बोलायचं नाही, अशी प्रतिक्रिया गुरुचरण सिंग याने दिली होती.