‘तारक मेहता…’ फेम गुरुचरण सिंगची प्रकृती चिंताजनक; वडील म्हणाले, ‘घरी आल्यापासून तो…’
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : 25 दिवस बेपत्ता असलेला रोशन सिंग सोढी अशा अवस्थेत परतला घरी, अभिनेत्याची प्रकृती चिंताजनक, वडिलांनी दिली मोठी माहिती, चाहचे चिंतेत... अनेक दिवसांनंतर अभिनेत्याच्या वडिलांनी सांगितली सत्य परिस्थिती...
‘तारक मेहता का उल्ट चष्मा’ मालिकेतील रोशन सिंग सोढी म्हणजे अभिनेता गुरुचरण सिंग तब्बल 25 दिवस बेपत्ता होता. अभिनेता बेपत्ता झाल्याची तक्रार खुद्द वडिलांनी दाखल केली होती. पण जेव्हा अभिनेता 25 दिवसांनंतर स्वतः घरी परतला तेव्हा गुरुचरण याच्या वडिलांनी आणि कुटुंबियांनी मोकळा श्वास घेतला. गुरुचरण सिंग 22 एप्रिल रोजी घर सोडून गेला होता. त्यानंतर 25 दिवसांनी म्हणजे 18 मे रोजी अभिनेता घरी परतला. पण अभिनेत्याची प्रकृती स्थिर नसल्याची माहिती वडील हरगीत सिंग यांनी दिली आहे.
हरगीत सिंग नुकताच झालेल्या एका मुलाखतीत म्हणाले, ‘गुरुचरण याची प्रकृती स्थिर नाही. त्याच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. गुरुचरण घरी परतल्यामुळे माझी प्रकृती सुधारत आहे. पण माझा मुलगा आजारी आहे…’ सध्या सर्वत्र गुरुचरण याची चर्चा रंगली आहे. एवढंच नाहीतर, चाहत्यांनी देखील चिंता व्यक्त केली आहे.
हरगीत सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या दिवशी गुरुचरण घरी परतला होता, त्या दिवशी तो अशक्त दिसत होता. त्याच्यावर उपचार सुरु आहे. पण त्याच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होत नाही. त्याची चिंता सतावत आहे… असं देखील अभिनेत्याचे वडील म्हणाले.
सांगायचं झालं तर, घरी परतल्यानंतर गुरुचरण सिंग याची पोलिसांनी चौकशी केली होती. तेव्हा आध्यात्मिक प्रवासासाठी गेल्याची कबुली अभिनेत्याने दिली होती पण याबद्दल अभिनेत्याच्या वडिलांना कोणत्याच प्रकारची माहिती नव्हती. शिवाय घरी परतल्यानंतर अभिनेत्याचा एक फोटो देखील तुफान व्हायरल झाला होता. गेल्या काही दिवसांपासून गुरुचरण सिंग चर्चेत आहे.
गुरुचरण सिंग सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. पण एक काळ असा होता, जेव्हा अभिनेत्याने रोशन सिंग सोढीच्या भूमिकेत चाहत्यांना पोट धरुन हसायला लावलं होतं. 2020 पर्यंत अभिनेत्याने चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण नंतर मालिकेला निरोप दिला.
आई-वडिलांच्या प्रकृतीचं कारण सांगत अभिनेत्याने ‘तारक मेहता का उल्ट चष्मा’ मालिका सोडली होती. अशात गुरुचरण पुन्हा अभियन क्षेत्रात पदार्पण करणार का? यावर अभिनेत्याचे वडील म्हणाले, ‘याबद्दल मी कोणतंही वक्तव्य करणार नाही. कारण गुरुचरण यालाच नाही माहिती की, तो पुढे काय करणार आहे. आम्ही दोघे आता वृद्ध झालो आहोत, कदाचित गुरुचरण आमच्यासोबत राहिल…’ असं देखील अभिनेत्याचे वडील म्हणाले आहेत.