‘मरेल पण सोडणार नाही…’, असित मोदी यांच्या अडचणीत मोठी वाढ, ‘तो’ व्हिडीओ पोस्ट जेनिफर म्हणाली…

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah | अभिनेत्रीचा 'तो' व्हिडीओ पाहिल्यानंतर व्यक्त कराल संताप, 'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम असित मोदी यांच्या अडचणीत मोठी वाढ, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त जेनिफर हिने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडीओची चर्चा...

'मरेल पण सोडणार नाही...', असित मोदी यांच्या अडचणीत मोठी वाढ, 'तो' व्हिडीओ पोस्ट जेनिफर म्हणाली...
Follow us
| Updated on: Apr 03, 2024 | 3:18 PM

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिका गेल्या अनेक वर्षांपासून चाहत्यांचं मनोरंजन करत आहे. मिसेस रोशन सिंग सोढीची भूमिका साकारणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीने शोचा निर्माता असित कुमार मोदीविरोधातील लैंगिक छळाचा खटला न्यायालयात दाखल केला होता आणि या लढाईमध्ये अभिनेत्रीचा विजय झाला असून असित मोदीला न्यायालयाने दोषी घोषित केलं आहे. पण न्यायालयाने सुनावलेल्या निर्णयावर अभिनेत्रीने नाराजी व्यक्त केली आहे. आता जेनिफर हिने सोशल मीडियावर असित मोदी विरोधात व्हिडीओ पोस्ट केला आहे.

जेनिफर म्हणाली, ‘शैलेश लोढा यांचा देखील न्यायालयात विजय झाला आहे. त्यावर ते चुकीच्या बातम्या पसरवत आहेत असं असित मोदी म्हणाले. माझा देखील न्यायालयात विजय झाला आहे. पण कोणी काहीही बोलत नाही. कृपा करुन काहीतरी बोला. मला देखील जाणून घ्यायचं कोणाला काय बोलायचं आहे..’

हे सुद्धा वाचा

‘तुमची डायरेक्शन टीम, प्रॉडक्शन हाऊस यांनी ठरवलं आहे की मला शिस्त नाही… मी सर्वांचा अपमन करते.. हे सर्व काही घडत असताना देवाने मालव प्रिया, मोनिका यांसारख्या चांगल्या लोकांना त्याठिकाणी पाठवलं… तुम्ही मला बोलत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा देव आणि चांगली माणसं माझ्या सोबत आहेत…’

‘लक्षात ठेवा मी एक अशी मधमाशी आहे जिला तुम्ही सोडलं तर, ती तुम्हाला कधीच सोडणार नाही… ती स्वत: मरेल पण तुम्हाला सोडणार नाही.. अजून खूप काही बाकी आहे…’ असं देखील अभिनेत्री व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त जेनिफर हिच्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे.

जेनिफर मिस्त्रीने असित मोदींवर केलेत गंभीर आरोप

सांगायचं झालं तर, जेनिफर मिस्त्री हिनेच्या म्हणण्यानुसार, ‘होळीच्या दिवशी असित मोदी, सोहेल रमानी आणि जतिन बजाज यांनी काही कारण नसताना अभिनेत्रीला सेटवर थांबवून ठेवलं. सेटवरुन प्रत्येक जण गेल्यानंतर अभिनेत्रीसोबत तिघांनी मिळून गैरवर्तन केलं. अखेर अभिनेत्रीने पोलीस स्थानकात लैंगिक छळाचा खटला दाखल केला.

250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.