‘तारक मेहता..’मधील सोनू भिडेला भेटला स्वप्नांचा राजकुमार; फिल्मी अंदाजात बॉयफ्रेंडने केलं प्रपोज

झील मेहता आता झगमगत्या विश्वात सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर ती कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. लहानपणीची क्रश असा तिचा उल्लेख अनेकजण करतात. मालिकेतली सोनू भिडे आता खऱ्या आयुष्यात लग्नबंधनात अडकण्यास सज्ज झाली आहे.

'तारक मेहता..'मधील सोनू भिडेला भेटला स्वप्नांचा राजकुमार; फिल्मी अंदाजात बॉयफ्रेंडने केलं प्रपोज
Jheel MehtaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 03, 2024 | 1:25 PM

मुंबई : 3 जानेवारी 2024 | ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतील प्रत्येक भूमिकेनं प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलंय. ही मालिका सोडल्यानंतरही त्यातील कलाकार सोशल मीडियावर चर्चेत आहेत. ‘तारक मेहता..’मध्ये भिडे मास्तरांच्या मुलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री झील मेहता सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. झीलने मालिकेत सोनूची भूमिका साकारली होती. या मालिकेतून तिला खूप प्रसिद्धा मिळाली. झीलने काही वर्षांपूर्वी या मालिकेचा निरोप घेतला होता. आता तिच्या स्वप्नवत प्रपोजलने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. झीलच्या बॉयफ्रेंडने तिला लग्नासाठी अनोख्या पद्धतीने प्रपोज केलं आहे. त्याचाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

प्रपोजलचा हा व्हिडीओ पोस्ट करत झीलने लिहिलं, ‘कोई मिल गया, मेरा दिल गया. लव्ह आज कल.’ या व्हिडीओमध्ये पहायला मिळतंय की झीलच्या बॉयफ्रेंडने तिच्यासाठी एक खास सरप्राइज प्लॅन केला. तिचे मित्रमैत्रिणी तिच्या डोळ्यांवर पट्टी बांधून सरप्राइजच्या ठिकाणी घेऊन येतात. त्यानंतर झीलचा बॉयफ्रेंड डान्स करून तिला प्रपोज करतो. हे सर्व पाहून झील अत्यंत भावूक होत त्याला मिठी मारते. झीलच्या प्रपोजलचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावर सर्वसामान्यांसोबतच ‘तारक मेहता..’मधील कलाकारसुद्धा तिला शुभेच्छा देत आहेत. मालिकेत टप्पू आणि सोनूची नेहमीच खास मैत्री पहायला मिळाली. टप्पूची भूमिका साकारलेल्या भव्य गांधीनेही कमेंट बॉक्समध्ये हृदयाचा इमोजी पोस्ट केला आहे.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by Jheel Mehta (@jheelmehta_)

झीलने शिक्षण पूर्ण करण्यासाठी मालिकेचा निरोप घेतला होता. मात्र तिने साकारलेली सोनूची भूमिका आजही लोकप्रिय आहे. ‘ती आमची लहानपणीची क्रश आहे’, असंही अनेकांनी कमेंट्समध्ये म्हटलंय. सोशल मीडियावर झीलचा मोठा चाहतावर्ग आहे. इन्स्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. झील मेहताने 2008 ते 2012 पर्यंत ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत सोनू भिडेची भूमिका साकारली होती. त्यानंतर शिक्षणासाठी तिने मालिका सोडली. आता झील तिच्या आईसोबत ब्युटी बिझनेसमध्ये काम करत आहे. ती मेकअप आर्टिस्ट असून झीलची आई हेअर स्टायलिस्ट आहे.

मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.