TMKOC च्या सेटवर बाबुजींना चपलेने मारण्यासाठी धावली बबिता, ‘त्या’ कृत्यामुळे अभिनेत्रीचा संताप
TMKOC: 'तारक मेहता का उल्ट चश्मा' मालिकेच्या सेटवर घटलेली 'ती' घटना, बाबुजींना चपलेने मारण्यासाठी धावली बबिता, नक्की झालं तरी काय होतं?, मालिकेची कायम चाहत्यांमध्ये रंगलेली असते चर्चा...
टीव्ही विश्वातील सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता उल्टा चष्मा’ गेल्या अनेक वर्षांपासून चाहत्यांचं मनोरंजन करत आहे. मालिकेतील सर्व कलाकारांनी चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. गोकुळधाम सोसायटीमधील लोकांची एकता आणि टप्पूसेनेमुळे मालिकेला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. गेल्या काही दिवसांपासून मालिकेबद्दल चांगल्या – वाईट गोष्टी देखील समोर येत आहेत. पण मालिकेने चाहत्यांचं मनोरंजन करणं थांबवलं नाही.
मालिकेतील कलाकार पडद्यावर सर्वांना पोट धरुन हसवतात. पण पडद्यामागे देखील त्यांनी मस्ती आणि धम्माल सुरु असते. पण एकदा असं काही झालं ज्यामुळे बाबुजींना चपलेने मारण्यासाठी बबिता धावली. बाबुजी म्हणजे अभिनेते अमित भट्ट यांच्यावर अभिनेत्री मुनमून दत्ता प्रचंड भडकली होती.
View this post on Instagram
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेतील जेनिफर मिस्त्री आणि कोमल भाभी यांनी एका मुलाखतीत मजेदार किस्सा सांगितला होता. एकदा मालिकेत सापाचा सीन शूट होणार होता. त्यासाठी नकली साप सेटवर आणण्यात आला होता. अशात सीन शूट झाल्यानंतर अमित भट्ट यांनी साप मुनमून हिच्या अंगावर फेकला.
View this post on Instagram
अमित भट्ट यांनी फेकलेला साप नकली होता. पण अभिनेत्री प्रचंड घाबरली. अमित भट्ट यांच्या मागे मुनमून चप्पल घेवून धावली. पूर्ण सेटवर अमित भट्ट – मुनमून दत्ता यांनी गोंधळ घातला होता. सुरुवातीला सेटवर असलेल्या प्रत्येकाला वाटलं दोघांमध्ये भांडणं झालं आहे. पण नंतर कळलं की दोघे मस्ती करत आहेत.
पुढे जेनिफर मिस्त्री म्हणाली, मुनमून हिने अमित भट्ट यांनी काठीने मारलं. अशात दिलीप जोशी यांनी सांगितलं अमित भट्ट यांना दुखापत झाली आहे. सांगायचं झालं तर, रोशन सिंग सोढी भूमिका साकारणारी जेनिफर मिस्त्री हिने मालिकेचा निरोप घेतला आहे. शिवाय अभिनेत्रीने निर्मात्यांवर अनेक गंभीर आरोप देखील केले.