‘तारक मेहता…’ फेम शैलेश लोढा यांनी घेतला सन्यास ? फोटो पाहून चाहते हैराण

टीव्ही विश्वातील प्रसिद्ध अभिनेते शैलेश लोढा यांच्या एका फोटोमुळे सर्वत्र खळबळ; व्हायरल होत असलेल्या अभिनेत्याच्या एका फोटोमुळे त्यांनी सन्यान घेतल्याची चर्चा... यामागे नक्की काय आहे सत्य?

'तारक मेहता…' फेम शैलेश लोढा यांनी घेतला सन्यास ? फोटो पाहून चाहते हैराण
'तारक मेहता…' फेम शैलेश लोढा यांनी घेतला सन्यास ? फोटो पाहून चाहते हैराण
Follow us
| Updated on: Feb 04, 2023 | 1:03 PM

मुंबई : टीव्ही विश्वातील प्रसिद्ध मालिकांपैकी एक मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ (taarak mehta ka ooltah chashmah). गेल्या १४ वर्षांपासून मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. काही वर्षांमध्ये मालिकेत अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत.अनेक कलाकारांनी मालिकेला रामराम ठोकल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला. मालिकेचा निरोप घेणाऱ्यांमध्ये अभिनेते शैलेश लोढा (shailesh lodha) देखील आहेत. शैलेश लोढा आणि मालिकेच्या निर्मात्यांसोबत वाद झाल्यानंतर शैलेश लोढा यांनी मालिकेचा निरोप घेतल्याचं अनेकदा समोर आलं. मानधनामुळे दोन्ही गटांमध्ये वाद झाल्याची माहिती समोर आली… त्यानंतर तुफान चर्चा रंगली. आता शैलेश लोढा यांचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये शैलेश लोढा संन्यासी या वेशभूषेत दिसत आहेत. खुद्द शैलेश लोढा यांनी फोटो पोस्ट केल्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे. फोटोमध्ये शैलेश लोढा भगव्या कपड्यांमध्ये दिसत आहेत, तर दुसरीकडे त्यांनी कपाळावर भस्म लावला आहे. शिवाय फोटोमध्ये ते ध्यानासाठी बसलेले दिसत आहे.

हे सुद्धा वाचा

इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत त्यांनी कॅप्शनमध्ये, ‘ हमको मन की शक्ति देना, मन विजय करें…’ , असं लिहिलं आहे. सध्या त्यांचा फोटो सर्वत्र व्हायरल होत आहे. फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी अभिनेत्याच्या फोटोवर कमेंट करत प्रतिक्रिया दिली आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्याच्या फोटोची चर्चा आहे.

फोटोपाहून शैलेश लोढा यांनी सन्यास तर घेतला नाही ना? असा प्रश्न चाहत्यांनी निर्माण केला आहे. अभिनेत्याच्या व्हिडीओवर एक युजर कमेंट करत म्हणाला, ‘मालिकेमध्ये पुन्हा या, तुमची प्रचंड आठवण येत आहे.’ तर अन्य एक युजर कमेंट करत म्हणाला, ‘सर तुम्ही असं का केलं, तुम्ही सन्यास नव्हता घ्यायला हवा…’ सध्या अभिनेत्याच्या पोस्टमुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.

फोटोनंतर शैलेश लोढा यांनी सन्यास घेतला की नाही, यावर स्पष्टीकरण दिलेलं नाही. तर अनेक जण शैलेश लोढा यांना पुन्हा मालिकेत येण्यासाठी सांगत आहेत. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील पूर्ण फी न मिळाल्याची शैलेश यांची तक्रार होती. यावर स्पष्टीकरण देताना निर्मात्यांनी सांगितले की त्यांची काही कागदपत्रे प्रलंबित आहेत. ते जमा केल्यावरच त्यांची पूर्ण फी त्यांना मिळेल. यावर प्रतिक्रिया देत शैलेश म्हणाले, ‘ऐकून घ्या, सत्यापासून लांब किती पळणार, इतिहासाचा एकदा विचार नक्की करा. कायम खोटं बोलणाऱ्यांनी आभाळाकडे पाहायला हवं…’ असं शैलेश लोढा म्हणाले होते.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.