Taarak mehta | असित कुमार मोदी यांनी खेळला मोठा गेम, चक्क गुरुचरण याची पलटी?, जेनिफर मिस्त्रीने केला धक्कादायक खुलासा
गेल्या अनेक वर्षांपासून तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका प्रेक्षकांचे जोरदार मनोरंजन करताना दिसत आहे. मात्र, मालिकेचे निर्माता असित कुमार मोदी हे मोठ्या वादात सापडले आहेत. असित कुमार मोदी यांच्यावर गंभीर आरोप हे सातत्याने केले जात आहेत. यामुळे चाहते देखील हैराण झाले आहेत.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून तारक मेहता का उल्टा चश्मा (Taarak mehta ka ooltah chashmah) ही मालिका जोरदार चर्चेत आहे. तारक मेहता ही मालिका तब्बल 15 वर्षांपासून चाहत्यांचे जोरदार मनोरंजन करताना दिसत आहे. विशेष म्हणजे प्रेक्षक देखील या मालिकेवर मोठे प्रेम करतात. तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतील कलाकारांची देखील सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग (Fan following) ही बघायला मिळते. गेल्या काही वर्षांपासून तारक मेहता मालिकेमध्ये दयाबेनची भूमिका साकारणारी अभिनेत्री अर्थात दिशा वकानी (Disha Vakani) ही मालिकेपासून दूर आहे. चाहते दयाबेनच्या पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत.
दुसरीकडे तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेचे निर्माता असित कुमार मोदी हे मोठ्या अडचणीमध्ये सापडले आहेत. मालिकेमध्ये मिसेस सोढीची भूमिका साकारणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्री हिने असित मोदीवर अनेक गंभीर आरोप हे केले आहेत. फक्त जेनिफर हिच नाही तर इतरही कलाकरांनी असित कुमार मोदी यांच्यावर आरोप केले. यामुळे प्रेक्षकांना मोठा धक्का बसलाय.
नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये आता जेनिफर मिस्त्री हिने धक्कादायक खुलासा हा केला आहे. जेनिफर मिस्त्री म्हणाली की, असित कुमार मोदी यांनी मोठा गेम खेळला आहे. गुरुचरण याला त्याचे काही वर्षांचे अडकलेले त्याच्या कामाचे पैसे हे असित कुमार मोदी यांच्याकडून देण्यात आले आहेत. माझ्या केसमध्ये गुरुचरण हा कोर्टामध्ये गवाही देणार होता.
असित कुमार मोदी यांच्या आॅफिसमधून 8 जून ला गुरुचरणला फोन आला आणि त्याचे तीन वर्षांचे अडकलेले पैसे देण्यात आले. सिंगापुरमध्ये असित मोदी हे माझ्यासोबत चुकीचे वागले होते आणि त्यावेळी गुरुचरण यानेच मला वाचवले होते. माझ्या केसमध्ये तो एक महत्वाची गवाही देणार होता. मात्र, असित कुमार मोदीने त्याला पैसे देत मोठा गेम खेळला आहे.
आता गुरुचरण हा गवाही देणार की नाही हे देखील मला माहिती नसल्याचे जेनिफर मिस्त्री म्हटले आहे. जेनिफर मिस्त्री पुढे म्हणाली की, मुळात म्हणजे असित कुमार मोदी हे माझ्यासोबत कशाप्रकारे वागत आहेत हे मी सर्वात अगोदर गुरुचरण यालाच सांगितले होते. सिंगापूरमध्ये काय घडले होते हे देखील गुरुचरण यालाच माहिती आहे. असित मोदी यांच्यावर प्रिया आहुजा हिने देखील गंभीर आरोप हे केले आहेत.