मुलाच्या मेहंदी कार्यक्रमात ‘जेठालाल’चा धमाकेदार डान्स, पत्नीच्या हातावर काढली मेहंदी; पहा खास व्हिडीओ

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत जेठालालची भूमिका साकारणारे अभिनेते दिलीप जोशी यांच्या खऱ्या आयुष्यातील मुलाचा लग्नसोहळा नुकताच पार पडला. या लग्नाचे आणि मेहंदी कार्यक्रमातील काही फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

मुलाच्या मेहंदी कार्यक्रमात 'जेठालाल'चा धमाकेदार डान्स, पत्नीच्या हातावर काढली मेहंदी; पहा खास व्हिडीओ
Dilip JoshiImage Credit source: Instagram/ @dilipxlife
Follow us
| Updated on: Dec 19, 2023 | 12:17 PM

मुंबई : 19 डिसेंबर 2023 | ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. यामध्ये जेठालालची भूमिका साकारणारे अभिनेते दिलीप जोशी यांच्या खऱ्या आयुष्यातील मुलाचा लग्नसोहळा नुकताच पार पडला. धूमधडाक्यात झालेल्या या लग्नसोहळ्याचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. दिलीप यांच्या मुलाचं नाव रित्विक असं आहे. आता रित्विकच्या संगीत आणि मेहंदी कार्यक्रमातील आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये दिलीप जोशी हे गाणं गाताना दिसत आहेत. 17 डिसेंबर रित्विकचं लग्न पार पडलं होतं. या लग्नसोहळ्याला ‘तारक मेहता..’मधील काही कलाकारसुद्धा उपस्थित होते.

रित्विकच्या लग्नातील फोटोंमध्ये ‘तारक मेहता..’ची टीम पहायला मिळाली. गेल्या काही वर्षांपासून मालिकेतून गायब असलेली दयाबेन अर्थात अभिनेत्री दिशा वकानीसुद्धा या लग्नसोहळ्याला उपस्थित होती. मुलीसोबतचा तिचा फोटोसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. एका व्हिडीओमध्ये मुलाच्या संगीत आणि मेहंदी कार्यक्रमात दिलीप जोशी अत्यंत आनंदाने गाणं गाताना दिसत आहेत. तर आणखी एका फोटोमध्ये ते त्यांच्या पत्नीच्या हातावर मेहंदी काढताना दिसत आहेत.

हे सुद्धा वाचा

दिलीप जोशी यांच्या मुलाच्या संगीत कार्यक्रमात टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील बरेच कलाकार सहभागी झाले होते. लोकप्रिय गायिका फाल्गुनी पाठकने या कार्यक्रमात सर्वांचं लक्ष वेधलं. दिलीप जोशी यांच्यासोबत फोटो क्लिक करतानाचा फाल्गुनी यांचाही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आणखी एका व्हिडीओमध्ये दिलीप जोशी डान्स करताना दिसत आहेत. मुलाच्या लग्नाचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट पहायला मिळत आहे.

दिलीप जोशी यांना ‘तारक मेहता..’ या मालिकेतून प्रचंड लोकप्रियता मिळाली. सोशल मीडियावर त्यांचा मोठा चाहतावर्ग असून त्यांना ‘जेठालाल’ या नावानेच सर्वाधिक ओळखलं जातं. या मालिकेत ते 2008 पासून जेठालालची भूमिका साकारत आहेत. या मालिकेमुळे त्यातील कलाकारांना पैसा आणि प्रसिद्धी दोन्ही मिळाल्या. दिलीप जोशी यांनी 1989 मध्ये ‘मैंने प्यार किया’ या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली.

View this post on Instagram

A post shared by @dilipxlife

रित्विकच्या लग्नसोहळ्याला दिशा वकानीसोबतच सुनैना फौजदार, अंबिका, नितीश भलुनी, पलक सिधवानी हे सर्व कलाकारसुद्धा उपस्थित होते. मालिकेत आत्माराम भिडेची भूमिका साकारणारे अभिनेते मंदार चांडवडकरसुद्धा लग्नाला उपस्थित होते. त्यांची पत्नी स्नेहलने सोशल मीडियावर कार्यक्रमाचे बरेच फोटो शेअर केले आहेत.

कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुपलं, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुपलं, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....