Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘तारक मेहता..’मध्ये अखेर दयाबेन परततेय; शूटिंगलाही सुरुवात

'तारक मेहता का उल्टा' या मालिकेतील लोकप्रिय दयाबेनची व्यक्तीरेखा अखेर आठ वर्षांनंतर परततेय. मालिकेच्या निर्मात्यांनी तिचं ऑडिशन घेतलंय आणि गेल्या आठवडाभरापासून टीमने तिच्यासोबत मॉक शूटिंगलाही सुरुवात केली आहे.

'तारक मेहता..'मध्ये अखेर दयाबेन परततेय; शूटिंगलाही सुरुवात
दिशा वकानीImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 29, 2025 | 1:34 PM

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय मालिका आहे. गेल्या 17-18 वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडली आहे. जेठालाल, दयाबेन, बापूजी, टप्पू, बबिताजी, अय्यर.. अशी सगळी पात्रं पसंतीस उतरली आहेत. गेल्या काही वर्षांत यातील अनेक कलाकारांनी मालिकेचा निरोप घेतला. त्यापैकीच एक अभिनेत्री म्हणजे दिशा वकानी. ‘तारक मेहता..’मध्ये तिने दयाबेनची भूमिका साकारली होती. 2017 मध्ये दिशाने बाळंतपणासाठी ब्रेक घेतला होता. मात्र तिचा हा ब्रेक इतका लांबला की आता आठ वर्षे होत आली तरी ती मालिकेत परतली नाही. दयाबेन मालिकेत कधी परतणार, असा सवाल वारंवार चाहत्यांकडून विचारण्यात आला. आता लवकरच चाहत्यांना आनंदाची बातमी मिळणार आहे.

‘न्यूज 18’ने दिलेल्या वृत्तानुसार, मालिकेचे निर्माते असितकुमार मोदी हे दयाबेनच्या भूमिकेसाठी सतत ऑडिशन्स घेत आहेत. अखेर त्यांनी एका अभिनेत्रीवर शिक्कामोर्तब केला आहे. ही अभिनेत्री कोण आहे, याचा खुलासा अद्याप झाला नाही. परंतु तिच्यासोबत टीमने मॉक शूटिंगला सुरुवात केली आहे. “होय, हे बरोबर आहे. असितजी हे नव्या दयाबेनच्या शोधात होते आणि नुकतेच ते एका अभिनेत्रीच्या ऑडिशनने प्रभावित झाले आहेत. त्या अभिनेत्रीसोबत सध्या मॉक शूट सुरू आहे. गेल्या आठवडाभरापासून ही शूटिंग सुरू आहे”, अशी माहिती ‘न्यूज 18’ने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.

हे सुद्धा वाचा

दिशाने 2017 मध्ये ही मालिका सोडली होती. बाळंतपणाच्या रजेवर गेलेली दिशा पुन्हा मालिकेत परतलीच नाही. तिला मालिकेत परत आणण्यासाठी दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी बरेच प्रयत्न केले. मात्र दिशा सध्या तिच्या खासगी आयुष्यावर लक्ष केंद्रीत करत असल्याचं म्हटलं गेलं. आतापर्यंत या मालिकेत अनेक नवीन कलाकार आले आणि जुने कलाकारांची एक्झिट झाली. यामध्ये दयाबेनची भूमिका साकारणारी दिशा वकानी, टप्पूची भूमिका साकारणारा राज अनाडकत, गोलीची भूमिका साकारणारा कुश शाह, तारक मेहताची भूमिका साकारणारे शैलेश लोढा, सोनूची भूमिका साकारणारी झील मेहता यांचा समावेश आहे. मात्र कलाकार जुने असो किंवा नवीन.. प्रत्येक भूमिकेनं प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडली आहे.

कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार
कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार.
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण...
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण....
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही..
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही...
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?.
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे...
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे....
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?.
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?.
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी.
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात.
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती.