‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मधील सोनू 5 वर्षांनंतर करताना दिसतेय असं काम, तुम्हीही म्हणाल…

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मधील सोनू म्हणजे अभिनेत्री निधी भानुशाली हिच्या नव्या प्रवासाची सुरुवात, 5 वर्षांनंतर पुन्हा सुरु केलं असं काम... अनेक वर्षांनंतर निधीला पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त निधी हिची चर्चा.

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मधील सोनू 5 वर्षांनंतर करताना दिसतेय असं काम, तुम्हीही म्हणाल...
Follow us
| Updated on: Jun 16, 2024 | 11:23 AM

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेत गोकुळधाम सोसायटीचे एकमेव सेक्रेटरी अत्माराम तुकाराम भिडे यांची मुलगी सोनू या भूमिकेला न्याय देणारी अभिनेत्री निधी भानुशाली गेल्या अनेक वर्षांपासून झगमगत्या विश्वापासून दूर आहे. अभिनयापासून दूर असली तरी निधी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. सांगायचं झालं तर, सोनू हिने पाच वर्षांपूर्वी मालिकेचा निरोप घेतला होता. त्यानंतर अभिनेत्री कोणत्याच शोमध्ये दिसली नाही. पण आता निधी हिने पुन्हा अभिनय विश्वात पदार्पण केलं आहे.

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेत सोनू ही भूमिका आता पलक सिधवानी करत आहे. पण चाहत्यांनी निधी हिला देखील भरभरुन प्रेम दिलं. निधीने शिक्षण पूर्ण करण्यासाठी 2019 मध्ये मालिकेचा निरोप घेतला आहे. अखेर पाच वर्षांनंतर निधी पुन्हा चाहत्यांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. सध्या सर्वत्र निधी हिच्या वेब सीरिजची चर्चा रंगली आहे.

निधी सध्या तिच्या ‘सिस्टरहुड’ वेब सीरिजमुळे चर्चेच आहे. ‘सिस्टरहुड’ वेब सीरिज 13 जून रोजी ॲमेझॉनवर प्रदर्शित झाली आहे. निधी हिने सीरिजमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सीरिजमध्ये निधीने एका विद्यार्थीनीच्या भूमिकेला न्याय दिला आहे. काही दिवसांपूर्वी खुद्द निधी हिने सीरिजचा ट्रेलर सोशल मीडियावर पोस्ट केले होता.

‘सिस्टरहुड’ वेब सीरिजचा ट्रेलर पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये ‘शाळेतील आठवणी आणि खास मैत्रिणी बनवण्यासाठी येत आहे गर्ल गँग…’ असं लिहिल होतं. चाहत्यांना ‘सिस्टरहुड’ वेब सीरिजचा ट्रेलर आवडला. शिवाय अनेकांनी लाईक्स आणि कमेंट करत अभिनेत्रीला शुभेच्छा देखील दिल्या…

2007 मध्ये जेव्हा ‘तारक मेहता’ शो सुरू झाला तेव्हा सोनूची भूमिका अभिनेत्री झील मेहताने साकारली होती. मात्र, त्यानंतर 2012 मध्ये निधी भानुशाली हिला सोनू ही भूमिका साकारण्याची संधी मिळाली. निधी 7 वर्षे या मालिकेचा भाग राहिली आणि त्यानंतर तिने आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी मालिकेचा निरोप घेतला.

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेमुळे निधी हिच्या लोकप्रियतेत आणि प्रसिद्धीमध्ये मोठी वाढ झाली. मालिका सोडल्यानंतर देखील चाहते निधी हिला विसरू शकले नाहीत. निधी हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. सोशल मीडियावर देखील निधी हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी निधी कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त निधी भानुशाली हिची चर्चा रंगली आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.