Dayaben: दिशा वकानी हिच्याबद्दल असित मोदी यांच्याकडून मोठा खुलासा; चाहत्यांसाठी ‘गुडन्यूज’

मालिकेला १५ वर्ष पूर्ण झाल्यामुळे निर्माते असित मोदी यांच्याकडून चाहत्यांसाठी 'गुडन्यूज', 'दयाबेन' हिच्याबद्दल केलं मोठं वक्तव्य... सर्वत्र दिशा वकानी हिची चर्चा...

Dayaben: दिशा वकानी हिच्याबद्दल असित मोदी यांच्याकडून मोठा खुलासा; चाहत्यांसाठी 'गुडन्यूज'
Follow us
| Updated on: Jul 30, 2023 | 2:18 PM

मुंबई | 29 जुलै 2023 : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ गेल्या १५ वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. १५ वर्षांच्या प्रवासात मालिकेने अनेक चढ – उतार पाहिले. पण मालिकेतील कलाकारांनी मात्र प्रेक्षकांना पोट धरुन हसवणं थांबवलं नाही. पण मालिकेतील दयाबेन म्हणजे अभिनेत्री दिशा वकानी हिला आजपर्यंत चाहते विसरू शकलेले नाहीत. गेल्या सहा वर्षांपूर्वी मालिकेतील दयाबेन हिने प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. पण आता दयाबेन पुन्हा मालिकेत पदार्पण करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. मालिकेला १५ वर्ष पूर्ण झाल्यामुळे निर्माते असित मोदी यांनी देखील दयाबेन पुन्हा मालिकेत पदार्पण करणार का? यावर मौन सोडलं आहे. सध्या सर्वत्र असित मोदी यांच्या वक्तव्याची चर्चा रंगत आहे.

मालिकेला १५ वर्ष पूर्ण झाल्यामुळे निर्माते असित मोदी यांनी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. असित मोदी म्हणाले, ‘१५ वर्षांच्या प्रवासात प्रेक्षकांनी मालिकेला भरभरुन प्रेम दिलं, पण तरी देखील चाहत्यांना गोकुळधाम सोसायटीमधील एका सदस्याची आठवण कायम येत असते. दयाबेन हिला चाहत्यांनी भरभरून प्रेम दिलं. आज देखील चाहते दयाच्या प्रतीक्षेत आहेत…’

‘दयाबेन म्हणजे दिशा वकानी लवकरच मालिकेत परतणार आहे…’ असं वक्तव्य असित मोदी यांनी केलं आहे. म्हणून दिशा वकानी पुन्हा मालिकेत कधी पदार्पण करेल या प्रतीक्षेत चाहते आहेत. दिशाने २०१७ मध्ये मालिकेतून ब्रेक घेतला होता. मोठ्या ब्रेकनंतर देखील दिशा मालिकेत परतली नाही. ज्यामुळे अनेक चर्चांना उधाण आलं. एवढंच नाही दिशा सोशल मीडियावर देखील सक्रिय नसते. गेल्या पाच वर्षांपासून अभिनेत्रीला कोणी पाहू शकलेलं नाही.

हे सुद्धा वाचा

दिशा मालिकेत पुन्हा कधी येणार… असा प्रश्न चाहते अनेकदा विचारतात. पण आता दिवाळीत अभिनेत्री मालिकेत पुन्हा दमदार पदार्पण करेल असं सांगण्यात येत आहे. मालिकेच्या एका एपिसोडमध्ये सुंदरलाल याने दयाबेन दिवाळीत गोकुळधाम सोसायटीत येणार अशी घोषणा केली.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेबद्दल सांगायचं झालं तर, गेल्या काही दिवसांपासून मालिका सतत वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. जवळपास १५ वर्षांच्या मालिकेच्या प्रवासात अनेक चढ – उतार आले. पण दिशा वकानी हिने पुन्हा पदार्पण केल्यानंतर मालिकेला नवीन वळण मिळणार.. असं म्हणायला हरकत नाही.

सध्या सर्वत्र तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेची चर्चा रंगत आहे. मालिकेचे काही विनोदी व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात.

संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड
संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड.
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले.
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे.
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ.
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले..
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले...
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी.
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?.
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?.
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण..
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण...
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात.