Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dayaben: ‘तारक मेहता..’मध्ये दयाबेन परतण्याच्या चर्चांवर ‘जेठालाल’ने सोडलं मौन

जवळपास पाच वर्षांपूर्वी अभिनेत्री दिशा वकानीने (Disha Vakani) ही मालिका सोडली होती. प्रसूती रजेसाठी तिने मालिका सोडली, पण त्यानंतर ती मालिकेत परतलीच नाही.

Dayaben: 'तारक मेहता..'मध्ये दयाबेन परतण्याच्या चर्चांवर 'जेठालाल'ने सोडलं मौन
Disha Vakani and Dilip JoshiImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 26, 2022 | 3:38 PM

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या मालिकेत दयाबेनची (Dayaben) भूमिका लवकरच परत येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली. जवळपास पाच वर्षांपूर्वी अभिनेत्री दिशा वकानीने (Disha Vakani) ही मालिका सोडली होती. प्रसूती रजेसाठी तिने मालिका सोडली, पण त्यानंतर ती मालिकेत परतलीच नाही. आता या मालिकेच्या निर्मात्यांनी दयाबेनच्या भूमिकेविषयी एका मुलाखतीत वक्तव्य केल्यानंतर पुन्हा एकदा तिची चर्चा होऊ लागली आहे. निर्मात्यांनी अनेकदा तिला मालिकेत परत येण्याविषयी विचारणा केली होती. काही कारणास्तव दिशाने नकार दिला होता. दयाबेनच्या कमबॅकच्या चर्चांवर आता मालिकेत जेठालालची भूमिका साकारणार दिलीप जोशी यांनी मौन सोडलं आहे.

काय म्हणाले दिलीप जोशी?

“दिशाने जवळपास पाच वर्षांपूर्वी ही मालिका सोडली होती. आता ती मालिकेत परत येणार की नाही हे फक्त प्रॉडक्शन हाऊसलाच माहित असेल आणि त्यात मी मधे पडू इच्छित नाही. त्याचसोबत जेव्हा दया मालिकेत काम करत होती, तेव्हा प्रेक्षकांनी जितकं प्रेम मालिकेवर केलं, तितकंच ते आतासुद्धा ती नसताना करत आहेत याचा मला खूप आनंद आहे”, असं दिलीप जोशी ‘ई टाइम्स’शी बोलताना म्हणाले.

हे सुद्धा वाचा

दिलीप जोशी हे गेल्या दहा वर्षांपासून या लोकप्रिय मालिकेत काम करत आहेत. याविषयी ते पुढे म्हणाले, “गेल्या दहा वर्षांपासून आमची मालिका प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करतेय. जर प्रेक्षकांचं मनोरंजन झालं नसतं, मालिकेला चांगला प्रतिसाद मिळाला नसता तर निर्मात्यांनी आतापर्यंत ही मालिका सुरु ठेवली नसती. पण एक अभिनेता म्हणून मी या मालिकेसाठी शूटिंग करणं एंजॉय करतो आणि एक प्रेक्षक म्हणून मला वाटतं, ही मालिका पुढेही मनोरंजन करत राहील.”

इन्स्टा पोस्ट-

2017 मध्ये दिशाने मालिकेतून ब्रेक घेतला होता. त्यावेळी ती गरोदर होती. दिशाने मुलीला जन्म दिला आणि त्यानंतर ती पुन्हा कामावर परतली नाही. ऑक्टोबर 2019 मध्ये तिने फक्त एक खास फोन सीन शूट केला होता. त्यामुळे आता दयाबेनच्या भूमिकेत प्रेक्षकांना दिशा वकानी पहायला मिळेल की दुसरी कोणी अभिनेत्री, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

उन्हाळ्यात ट्रेकला जाताय तर थांबा, भर उन्हात ट्रेक करणं पडलं महागात
उन्हाळ्यात ट्रेकला जाताय तर थांबा, भर उन्हात ट्रेक करणं पडलं महागात.
जन्मदात्या आईनंच पोटच्या पोराला संपवलं, नांदेडमध्ये खळबळजक घटना
जन्मदात्या आईनंच पोटच्या पोराला संपवलं, नांदेडमध्ये खळबळजक घटना.
अमरावतीत मुख्यमंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचं दहन
अमरावतीत मुख्यमंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचं दहन.
लातूर मनपा आयुक्त मनोहरेंना एअर अ‍ॅम्ब्यूलन्सने मुंबईत आणणार
लातूर मनपा आयुक्त मनोहरेंना एअर अ‍ॅम्ब्यूलन्सने मुंबईत आणणार.
'पेशंटवर साडेपाच तास उपचारच नाही', चाकणकरांकडून मोठी अपडेट काय?
'पेशंटवर साडेपाच तास उपचारच नाही', चाकणकरांकडून मोठी अपडेट काय?.
गर्भवतीच्या मृत्यूस रुग्णालयच दोषी; रूपाली चाकणकरांनी स्पष्टच सांगितलं
गर्भवतीच्या मृत्यूस रुग्णालयच दोषी; रूपाली चाकणकरांनी स्पष्टच सांगितलं.
'तनिषाची मृत्यूनंतर बदनामी', भिसे कुटुंबीयांचं चाकणकरांना पत्र अन्...
'तनिषाची मृत्यूनंतर बदनामी', भिसे कुटुंबीयांचं चाकणकरांना पत्र अन्....
पंतप्रधान 2025 चा काळ पूर्ण करतील का यावर मला शंका, राऊतांची टीका
पंतप्रधान 2025 चा काळ पूर्ण करतील का यावर मला शंका, राऊतांची टीका.
'त्यांचा घराचा पत्ता काढणार आणि घरी येऊन...', सोमय्यांना FB वरून धमकी
'त्यांचा घराचा पत्ता काढणार आणि घरी येऊन...', सोमय्यांना FB वरून धमकी.
'आलमगीर औरंगजेब..', दादरमध्ये मनसेची बॅनरबाजी
'आलमगीर औरंगजेब..', दादरमध्ये मनसेची बॅनरबाजी.