“वयाने छोट्या किंवा मोठ्याशी लग्न केलं तरी..”; ‘तारक मेहता..’च्या बबिताचं ट्रोलर्सना सडेतोड उत्तर

'तारक मेहता..' मालिकेत टप्पूची भूमिका साकारलेला अभिनेता राज अनाडकतशी गुपचूप साखरपुडा उरकल्याच्या चर्चांवर अभिनेत्री मुनमुन दत्ताने तीव्र संताप व्यक्त केला आहे. इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये पोस्ट लिहित तिने या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे.

वयाने छोट्या किंवा मोठ्याशी लग्न केलं तरी..; 'तारक मेहता..'च्या बबिताचं ट्रोलर्सना सडेतोड उत्तर
Munmun Dutta and Raj AnandkatImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 16, 2024 | 10:58 AM

मुंबई : 16 मार्च 2024 | ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत बबिताची भूमिका साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता आणि टप्पूची भूमिका साकारलेला अभिनेता राज अनाडकत यांनी गुपचूप साखरपुडा उरकल्याच्या जोरदार चर्चा होत्या. मात्र दोघांनीही त्यावर प्रतिक्रिया देत चर्चा केवळ अफवा असल्याचं स्पष्ट केलं. एकीकडे राजने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये पोस्ट लिहित साखरपुड्याच्या चर्चा खोट्या आणि तथ्यहीन असल्याचं म्हटलं होतं. आता दुसरीकडे मुनमुननेही तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये काही पोस्ट लिहिल्या आहेत. या पोस्टद्वारे तिने ट्रोलर्सनाही सडेतोड उत्तर दिलं आहे.

एका पोस्टमध्ये मुनमुनने लिहिलं, ‘हे अत्यंत हास्यास्पद आहे की कशा पद्धतीने खोट्या बातम्या वणव्यासारख्या पसरल्या जातात आणि बूमरँगप्रमाणे त्या पुन्हा चघळल्या जातात. पुन्हा एकदा सर्व गोष्टी स्पष्ट करते. माझा साखरपुडा झालेला नाही, लग्नही झालेलं नाही आणि मी गरोदरही नाही.’ यानंतर मुनमुनने आणखी एक पोस्ट लिहित ट्रोलर्सचं तोंड बंद केलं आहे. यात तिने लिहिलं, ‘मी जेव्हा कधी लग्न करेन तेव्हा मुलगा माझ्यापेक्षा वयाने लहान असला किंवा मोठा असला तरी मी अभिमानाने करेन. माझ्या बंगाली रक्तातच ही गोष्ट आहे. मी नेहमीच अभिमानाने आणि साहसाने गोष्टींना सामोरं जाते. जय मा दुर्गा!’

बबिताची पोस्ट-

हे सुद्धा वाचा

‘अशा खोट्या गोष्टींवर मी माझी आणखी ऊर्जा वाया घालवणार नाही. त्यापेक्षा मी माझ्या आयुष्यातील चांगल्या गोष्टींकडे वळेन. देव प्रेमळ आणि दयाळू आहे. माझं आयुष्यही खूप सुंदर आहे’, असंही तिने शेवटी स्पष्ट केलं. 2021 मध्ये सर्वांत आधी राज आणि मुनमुनच्या डेटिंगच्या चर्चांना सुरुवात झाली होती. त्यावेळी दोघांनीही या चर्चांना नाकारलं होतं. “जे कोणी सतत माझ्याबद्दल लिहित आहेत, त्यांनी त्या बनावट गोष्टींचा माझ्या आयुष्यावर काय परिणाम होऊ शकतो याचा एकदा तरी विचार करावा. माझ्या परवानगीशिवाय माझ्या आयुष्याबद्दल या खोट्या गोष्टी लिहिल्या जात आहेत”, असं राजने म्हटलं होतं.

सध्या ‘तारक मेहता..’मध्ये मुनमुन काम करत असली तरी राजने खूप आधीच मालिका सोडली आहे. मुनमुन गेल्या 15 वर्षांपासून या मालिकेत बबिताची भूमिका साकारतेय. राज आणि मुनमुन यांच्या वयात 9 वर्षांचं अंतर आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.