Tabu : ‘त्या’ रात्रीच्या आठवणीने… तब्बू सोबत काय घडलं ‘त्या’ रात्री?

Tabu : बॉलिवूड अभिनेत्रींच्या वाट्याला येतात असंख्य संकटं... 'त्या' रात्री तब्बू हिच्यासोबत नक्की काय घडलं होतं, ज्यामुळे...; एका काळ असा होता जेव्हा तब्बू हिचं बॉलिवूडवर वर्चस्व होतं.. पण आता अभिनेत्री झगमगत्या विश्वात पूर्वीप्रमाणे सक्रिय नसली तरी तब्बू हिच्याबद्दल अनेक गोष्टी समोर येत असतात.

Tabu : 'त्या' रात्रीच्या आठवणीने... तब्बू सोबत काय घडलं 'त्या' रात्री?
Follow us
| Updated on: Dec 03, 2023 | 10:03 AM

मुंबई | 3 मुंबई 2023 : बॉलिवूडमध्ये असे असंख्य रहस्य आहेत, जे कधी समोर येत नाहीत आणि काही घटनांचा खुलासा झाल्यानंतर मात्र सर्वत्र खळबळ माजते.. आता देखील असंच काही झालं आहे. एक काळ असा होता जेव्हा अभिनेत्री तब्बू हिचं बॉलिवूड वर्चस्व होतं. असा एकही अभिनेता किंवा दिग्दर्शक नाव्हता ज्याला तब्बू हिच्यासोबत काम करायचं नव्हतं. पण एक अभिनेता असा देखील होता, ज्याला पूर्ण करियरमध्ये कधीच तब्बू हिच्यासोबत स्क्रिन शेअर करण्याची संधी मिळाली नाही. तो अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेता जॅकी श्रॉफ आहे. तब्बू हिने अनेक प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत काम केलं आणि प्रसिद्धी मिळवली पण जॅकी आणि तब्बू यांची जोडी कधीच मोठ्या पडद्यावर झळकली नाही.. यामागे मोठं कारण आहे.

एका पार्टीमध्ये असं काही घडलं ज्यामुळे जॅकी याच्यासोबत कधीच काम न करण्याचा निर्णय तब्बू हिने घेतला. तब्बू बहीण फराह नाझ हिच्यासोबत एका पार्टीमध्ये गेली होती. तेव्हा तब्बू हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं नव्हतं. त्या पार्टीमध्ये जॅकी देखील उपस्थित होता. पार्टीमध्ये घडलेल्या एका घटनेनंतर तब्बू हिने जॅकी याच्यासोबत काम न करण्याचा निर्णय घेतला.

‘त्या’ रात्री नक्की काय घडलं?

हे सुद्धा वाचा

1986 साली तब्बू हिची बहीण फराह आणि जॅकी ‘दिलजले’ सिनेमाची शुटिंग करत होते. पार्टीचं आयोजन डॅनीने त्याच्या घरी केलं होतं. पार्टीमध्ये फराह आणि तब्बू देखील पोहोचल्या होत्या. पार्टीला खास बनवण्यासाठी अनेक पदार्थ आणि ड्रिंक्सचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. रिपोर्टनुसार, जॅकी याने प्रमाणाबाहेर ड्रिंक केली होती.

जॅकी श्रॉफ पार्टीत एवढा मद्यधुंद झाला होता की त्याला कसलं भाक उरलं नव्हतं. नशेत अभिनेता तब्बूजवळ गेला आणि तिच्या आणखी जवळ जाण्याचा प्रयत्न केला. डॅनीने जॅकी श्रॉफला वाईट कृत्य करताना पाहिलं. परिस्थिती पाहाता डॅनीने जॅकीला रोखण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला आणि त्याला तब्बूपासून दूर नेलं. जॅकी याची वागणूक पाहून फराह हिला प्रचंड राग आला…

संबंधीत घटना माध्यामांसमोर आल्यानंतर सर्वत्र खळबळ माजली होती. तब्बू हिच्या बहिणीने सर्वांसमोर संताप व्यक्त केला. पण गैरसमज असल्याचे सांगून तिने वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. ती पार्टी आणि पार्टीत घडलेल्या घटनेनंतर तब्बू हिने जॅकी याच्यासोबत काम न करण्याचा निर्णय घेतला. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त तब्बू हिची चर्चा रंगली आहे.

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.