Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

करियर हिट पण लव्हलाईफ फ्लॉप, प्रेमावरुन अभिनेत्रीचा उठला विश्वास; कायम एकटीच राहण्याची घेतली शपथ

एक दोन नाही तर, तीन सेलिब्रिटींनी बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीला प्रेमात फसवलं.. एकासोबत होती दहा वर्ष रिलेशनशिपमध्ये... 'त्या' धक्कादायक घटनेनंतर झाले विभक्त...

करियर हिट पण लव्हलाईफ फ्लॉप, प्रेमावरुन अभिनेत्रीचा उठला विश्वास; कायम एकटीच राहण्याची घेतली शपथ
Follow us
| Updated on: Jun 18, 2023 | 4:15 PM

मुंबई : बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्याचं करियर हिट झालं पण, लव्हलाईफ फ्लॉप ठरली.. अभिनेत्रींच्या आयुष्यात प्रमेची एन्ट्री झाली नाही, असं काहीही नाही, पण कोणत्याच्या सेलिब्रिटींसोबत अभिनेत्रींचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. महत्त्वाचं म्हणजे प्रेमात अपयश मिळाल्यानंतर अभिनेत्रींकधी लग्न देखील केलं नाही. बॉलिवूडच्या काही अभिनेत्री आज सर्वकाही असून देखील एकटं आयुष्य जगतात… अशाच अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अभिनेत्री तब्बू… तब्बून अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनात राज्य केलं. हिंदी चित्रपटसृष्टीत 90च्या दशकात प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री तब्बू (bollywood actress tabu) आजही फार लोकप्रिय आहे. मोठ्या पड्यावर फार कमी सक्रिय असणारी तब्बू चाहत्यांच्या मनात मात्र आजही कायम आहे.

बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करत असताना, अभिनेत्रीचं एक, दोन नाही तर तीन सेलिब्रिटींसोबत नाव जोडण्यात आलं. पण तिघांसोबत देखील अभिनेत्रीचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. आज पैसा, प्रसिद्धी, संपत्ती असूनही अभिनेत्री एकटं आयुष्य जगत आहे. तब्बू हिचं नाव दाक्षिणात्य सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेता नागार्जुन याच्यासोबत देखील जोडण्यात आलं.. (tabu and nagarjun painful love stroy)

एक काळ होता जेव्हा सर्वत्र फक्त आणि फक्त नागार्जुन आणि तब्बू यांच्या नात्याची चर्चा होती. दोघांनी एकमेकांना १० वर्ष डेट देखील केलं. पण दोघांचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. नागर्जुन विवाहित असल्यामुळे अभिनेत्याने अर्ध्यातच तब्बूची साथ सोडली. एवढंच नाही तर, अनेक मुलाखतींमध्ये दोघांनी एकमेकांसोबत असलेल्या संबंधांबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं. पण आता दोघे त्यांच्या आयुष्यात आनंदी आहेत..

हे सुद्धा वाचा

अक्किनेनी नागार्जुन आणि तब्बू यांची ओळख अभिनेत्री १६ आणि अभिनेता २२ वर्षांचा असताना झाली होती. आज अक्किनेनी नागार्जुन त्याच्या आयुष्यात फार पुढे गेला आहे. तब्बू मात्र आजही एकटं आयुष्य जगते. आज तब्बू आणि अक्किनेनी नागार्जुन यांच्या नात्याला अनेक वर्ष झाली पण त्यांच्या नात्याची चर्चा कायम रंगलेली असते.

अभिनेत्रीचं नाव फक्त नागर्जुन याच्यासोबतच नाही तर अभिनेता संजय कपूर याच्यासोबत देखील जोडण्यात आलं.. पण दोघांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तब्बूचं नाव प्रसिद्ध दिग्दर्शक साजिद नाडियावाला याच्यासोबत देखील जोडण्यात आलं.. दोघांनी काही वर्ष एकमेकांना डेट केलं त्यानंतर विभक्त झाले…

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.