Tabu : प्रसिध्द अभिनेत्यामुळे तब्बू अविवाहित, ‘तो’ मात्र दुसऱ्या पत्नीसोबत जगतोय आनंदी आयुष्य

Tabu : वयाच्या 52 व्या वर्षी देखीलट तब्बू एकटीच... पैसा, संपत्ती सर्वकाही आहे, पण जोडीदार नाही, 'या' अभिनेत्यांमुळे घेतला लग्न न करण्याचा निर्णय? सध्या सर्वत्र तब्बू हिच्या खासगी आयुष्याची चर्चा... अभिनेत्रीच्या आयुष्यात बॉयफ्रेंडची एन्ट्री झाली पण पतीची नाही...

Tabu : प्रसिध्द अभिनेत्यामुळे तब्बू अविवाहित, 'तो' मात्र दुसऱ्या पत्नीसोबत जगतोय आनंदी आयुष्य
Follow us
| Updated on: Nov 04, 2023 | 1:59 PM

मुंबई | 4 नोव्हेंबर 2023 : अभिनेत्री तब्बू हिने 90 च्या दशकात एकापेक्षा एक भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आज देखील तब्बू तिच्या सिनेमांमुळे चर्चेत असते. आजही तब्बू बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. पण एककाळ असा होता, जेव्हा तब्बू तिच्या सिनेमांमुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली होती. तब्बू हिचं नाव अनेक प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत जोडण्यात आलं. पण कोणासोबत देखील अभिनेत्रीचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. एका अभिनेत्यासोबत तर अभिनेत्री एक दोन नाही तर, तब्बल 10 वर्ष रिलेशनशिपमध्ये होती. पण अभिनेता विवाहित असल्यामुळे तब्बू हिला प्रेमात त्याग करावा लागला… त्यानंतर तब्बू हिने कधीही लग्न न करण्याचा निर्णय घेतला. आज वयाच्या 52 व्या वर्षी देखील तब्बू एकटीच राहाते.

तब्बू ज्या अभिनेत्यासोबत 10 वर्ष रिलेशनशिपमध्ये होती, तो अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेता नागार्जुन आहे. एककाळ होता जेव्हा फक्त झगमगत्या विश्वात नाही तर, चाहत्यांमध्ये देखील नागार्जुन आणि तब्बू यांच्या नात्याची चर्चा रंगली होती. मात्र, या दोघांनी कधीही त्यांच्या नात्यावर उघडपणे चर्चा केले नाही.

अनेकदा दोघांना एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं होतं. पण तेव्हा नागार्जुन विवाहित होता. एवढंच नाही तर, मुंबईत काम सुरु असताना देखील नागार्जुनबरोबर वेळ घालवण्यासाठी तिने हैदराबादमध्ये घर खरेदी केल्याची देखील माहिती समोर आली होती.

हे सुद्धा वाचा

नागार्जुनचं देखील तब्बूवर खूप प्रेम होतं, पण पत्नीला सोडून तब्बूसोबत संसार थाटण्याचा निर्णय अभिनेत्याने घेतला नाही. म्हणूनच तब्बूने नागार्जुनपासून स्वत:ला दूर केलं. 2012 मध्ये नागार्जुन आणि तब्बू यांचे मार्ग वेगळे झाले. असं देखील अनेकदा समोर आलं.

आज तब्बू संपत्ती, पैसा, प्रसिद्धी सर्वकाही असून देखील एकटं आयुष्य जगत आहे. पण नागार्जुन मात्र दुसऱ्या पत्नीसोबत आनंदी आयुष्य जगत आहे. नागार्जुन देखील कायम त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतो.

एवढंच नाही तर, एका मुलाखतीत तब्बू हिने नागार्जुन याच्यासोबत असलेल्या नात्यावर मौन सोडलं होतं. ‘आयुष्यात बॉयफ्रेंड येतात जातात, पण माझ्या आयुष्यात अक्किनेनी नागार्जुन कायम राहील. आमच्या नात्याला कोणतं लेबल नाही…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली होती. सध्या सर्वत्र तब्बू हिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.