आयुष्यमान खुरानावर दु:खाचा डोंगर, ७ वर्षांनंतर पुन्हा पत्नीच्या आयुष्यात परतला तो भयानक आजार
आयुष्मान खुरानाची पत्नी ताहिरा कश्यपने सोशल मीडियाच्या माध्यमातून पुन्हा एकदा ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचे सांगितले आहे. तिच्या या पोस्टने सर्वांना धक्का बसला आहे.

बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना आणि त्याची पत्नी ताहिरा कायम चर्चेत असतात. 7 वर्षांपूर्वी आयुष्यमानची पत्नी ताहिराला ब्रेस्ट कॅन्सर झाला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा तिला कॅन्सर झाल्याचे समोर आले आहे. तिने सोशल मीडियावर कलेल्या पोस्टने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. तिच्या पोस्टवरून ती पुन्हा एकदा ब्रेस्ट कॅन्सरची शिकार झाल्याचे दिसते.
ताहिराने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटच्या पेजवर एक पोस्ट शेअर केली आहे. ‘सात वर्षे वेदना सहन केल्यानंतर किंवा नियमित तपासणी केल्यानंतरही. मी दुसरा पर्याय निवडला आणि इतरांना नियमित मॅमोग्राम करत राहण्याचा सल्ला दिला. माझा राऊंड-2 सुरू झाला आहे’ या आशयाची पोस्ट तिने केली आहे. ताहिराने तिच्या पोस्टसोबत #onemoretime लिहिले, ज्यामुळे ताहिरा पुन्हा या कॅन्सरला बळी पडल्याचे दिसत आहे.
7 वर्षांपूर्वी झाला होता कॅन्सर
ताहिराला 2018 मध्ये स्तनाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले होते. गेल्या महिन्यात तिने Instagram वर एक कठोर संदेश शेअर केला होता, ज्यामध्ये ती तिचा टक्कल असलेला लूक स्वीकारताना दिसली होती. हा केमोथेरपीचा परिणाम होता. उपचारादरम्यान टिपलेले अनेक क्षणही तिने पोस्ट केले होते.
View this post on Instagram
सोशल मीडियावर केली पोस्ट
तिच्या पोस्टमध्ये तिने, “हेच जीवन आहे! आणि तुम्ही त्याचा जास्तीत जास्त फायदा घ्या.. हा अनुभव किती नम्र आहे याची तुम्हाला जाणीव झाली. मला अशा अनेक शूर महिला माहित आहेत ज्यांनी त्यांच्या सर्व शक्तीनिशी लढा दिला आहे. मी त्या सर्वांच्या सन्मान करते. प्रत्येकाच्या आयुष्यातील अनुभव महत्त्वाचे असतात. आपल्यापैकी प्रत्येकजण किती महत्त्वाचा आहे हे जाणून घेण्यासाठी. पृथ्वीवर यासारखे दुसरे काही नाही. जे करता येईल ते करा” असे म्हटले आहे.