करीना कपूर तैमूरच्या नॅनीला देते 2.5 लाख रुपये महिना? ललिता डिसिल्वाकडून सत्य समोर

Taimur Jeh Nanny Lalita Dsilva: तैमूर आणि जेह यांच्या नॅनीला महिन्याला मिळतो 2.5 लाख रुपये पगार..., खुद्द नॅनी ललिता डिसिल्वा यांनी सांगितलं सत्य, शिवाय घरात कशी वागणूक मिळते यावर देखील म्हणाल्या..., सध्या सर्वत्र नॅनी ललिता डिसिल्वा यांची चर्चा...

करीना कपूर  तैमूरच्या नॅनीला देते 2.5 लाख रुपये महिना? ललिता डिसिल्वाकडून सत्य समोर
Follow us
| Updated on: Jul 28, 2024 | 3:54 PM

अभिनेत्री करीना कपूर आणि अभिनेता सैफ अली खान यांचा मोठा मुलगा तैमूर याच्या जन्मानंतर, त्याला पाहण्यासाठी चाहते आणि पापाराझींची गर्दी जमायची. त्यामुळे तैमूर याची नॅनी ललिता डिसिल्वा यांना भीती देखील वाटायला लागली होती. ललिता डिसिल्वा तैमूर याच्यानंतर आता जेह याची देखील काळजी घेतात. ललिता डिसिल्वा यांना कायम तैमूर आणि जेह यांच्यासोबत स्पॉट केलं जातं. दरम्यान, नुकताच झालेल्या मुलाखतीत ललिता डिसिल्वा यांनी कपूर कुटंब आणि मिळणाऱ्या पगाराबद्दल मोठं वक्तव्य केलं.

मुलाखतीत ललिता डिसिल्वा म्हणाल्या, ‘करीना कपूर आणि सैफ अली खान प्रचंड साधे आहेत. सकाळी खाण्यासाठी स्टाफ आणि करीना – सैफ यांचे पदार्थ सारखेच असतात. स्टाफसाठी वेगळं असं काही नसतं. कधीकधी तर आम्ही एकत्र बसून नाश्टा करतो. आम्ही एकत्र क्वालीटी टाईम स्पेंड करतो…’

पुढे ललिता डिसिल्वा यांना 2.5 लाख रुपये पगार मिळतो का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर ललिता डिसिल्वा म्हणाल्या, ‘2.5 लाख रुपये? असं असतं तर बरं झालं असतं? तुमच्या तोंडात साखर… या सर्व फक्त अफवा आहेत.’ सांगायचं झालं तर, ललिता डिसिल्वा गेल्या अनेक वर्षांपासून तैमूर आणि जेह यांचा सांभाळ करत आहेत. सोशल मीडियावर त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल होत असतात.

करीना कपूर हिने देखील एका मुलाखतीत ललिता डिसिल्वा यांच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं होते. मुलांच्या नॅनीसाठी एक नियम ठरवून देण्यात आला आहे. करीना म्हणाली होती, ‘माझ्या मुलांची नॅनी त्यांच्यासोबत जेवते… आधी मी आणी सैफ जेवायचो. एकदा तैमूरने नॅनीला विचारलं, तिकडे बसून का जेवतेस? तेव्हा पासून तैमूर, जेह त्यांच्या नॅनी सोबतच जेवतात…’

सांगायचं झालं तर, करीना कपूर कायम तिच्या खासगी आयुष्याबद्दल चाहत्यांना सांगत असते. शिवाय सोशल मीडियावर अभिनेत्री मुलांसोबत फोटो आणि व्हिडीओ देखील पोस्ट करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात. सोशल मीडियावर करीना कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.