Tamannaah Bhatia | भर गर्दीत बॅरिकेडवरून उडी मारत ‘तो’ तमन्नाच्या दिशेने धावत आला अन्..

तमन्ना तिच्या खासगी आयुष्यामुळेही सोशल मीडियावर चर्चेत आहे. अभिनेता विजय वर्माला डेट करत असल्याची कबुली तिने स्वत:च एका मुलाखतीत दिली. त्यानंतर अनेकदा दोघांना डेटवर जाताना पाहिलं गेलं. ‘लस्ट स्टोरीज 2’मध्ये दोघांनी पहिल्यांदा एकत्र काम केलं.

Tamannaah Bhatia | भर गर्दीत बॅरिकेडवरून उडी मारत 'तो' तमन्नाच्या दिशेने धावत आला अन्..
Tamannaah BhatiaImage Credit source: Youtube
Follow us
| Updated on: Aug 08, 2023 | 9:10 AM

केरळ : अभिनेत्री तमन्ना भाटियाचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्येही तिने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. नुकतीच तिने केरळातील एका कार्यक्रमाला हजेरी लावली. ती या कार्यक्रमातून निघताना एका चाहत्याने सुरक्षाव्यवस्था तोडून तिची भेट घेण्याचा प्रयत्न केला. तमन्नाशी हात मिळवण्यासाठी आणि तिच्यासोबत सेल्फी क्लिक करण्यासाठी तो धावत आला होता. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी तमन्नाच्या समजंस वागण्याचं कौतुक केलं आहे.

जेव्हा चाहता भर गर्दीत तिच्या बाजूने धावून येतो, तेव्हा तमन्नाच्या आजूबाजूला असलेले सुरक्षारक्षक त्याला मागे खेचतो. त्यावेळी तमन्ना सुरक्षारक्षकांना समजावून संबंधित चाहत्यांशी नम्रतेने बोलताना दिसते. यावेळी ती त्याच्याशी हात मिळवते आणि त्याच्यासोबत सेल्फीसुद्धा क्लिक करते. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘ज्या पद्धतीने तिने परिस्थिती हाताळली, ते पाहून ती खूपच नम्र आणि गोड स्वभावाची व्यक्ती असल्याचं दिसतंय’, असं एकाने लिहिलं. तर ‘चाहत्याने जे केलं, ते चुकीचंच होतं. पण तमन्नाच्या नम्र स्वभावाने त्याला वाचवलं’, असं दुसऱ्या युजरने म्हटलं आहे. या कमेंट्समध्ये अनेकांनी कार्यक्रमाच्या आयोजकांवरही टीका केली.

हे सुद्धा वाचा

तमन्ना सध्या तिच्या चित्रपटांमुळे, वेब सीरिजमुळे आणि खासगी आयुष्यामुळेही चर्चेत आहे. ‘भोला शंकर’ आणि ‘जेलर’ हे तिचे दोन मोठे चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. भोला शंकरमध्ये ती चिरंजीवी यांच्यासोबत तर जेलरमध्ये ती रजनीकांत यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. काही दिवसांपूर्वी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तिचा ‘लस्ट स्टोरीज 2’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. यामध्ये तिने अभिनेता विजय वर्मासोबत बरेच बोल्ड सीन्स दिले होते. ‘जी करदा’ या दुसऱ्या सीरिजमधील बोल्ड दृश्यांमुळेही तमन्ना सोशल मीडियावर चर्चेत होती.

तमन्ना तिच्या खासगी आयुष्यामुळेही सोशल मीडियावर चर्चेत आहे. अभिनेता विजय वर्माला डेट करत असल्याची कबुली तिने स्वत:च एका मुलाखतीत दिली. त्यानंतर अनेकदा दोघांना डेटवर जाताना पाहिलं गेलं. ‘लस्ट स्टोरीज 2’मध्ये दोघांनी पहिल्यांदा एकत्र काम केलं. 2023 या वर्षाच्या सुरुवातीपासूनच तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांना उधाण आलं. नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या पार्टीत या दोघांना एकमेकांना किस करताना पाहिलं गेलं होतं. गोव्यातील दोघांचा फोटो व्हायरल झाला होता.

बीडचा बिहार की गँग्स ऑफ वासेपूर? सरपंच हत्या प्रकरणात सूत्रधार कोण?
बीडचा बिहार की गँग्स ऑफ वासेपूर? सरपंच हत्या प्रकरणात सूत्रधार कोण?.
बीड सरपंचाच्या हत्येचा 'आका', देवेंद्र फडणवीसांचा कोणाकडे इशारा?
बीड सरपंचाच्या हत्येचा 'आका', देवेंद्र फडणवीसांचा कोणाकडे इशारा?.
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.