IPL वादग्रस्त प्रकरणी तमन्ना भाटिया अडचणीत, काय आहे पूर्ण प्रकरण?
Tamanna Bhatia: IPL वादग्रस्त प्रकरणी तमन्ना भाटिया अडचणीत, चौकशीसाठी अभिनेत्री गुवाहाटीत, अनेक सेलिब्रिटींची देखील करण्यात आली होती चौकशी, नक्की काय आहे प्रकरण? सध्या सर्वत्र तमन्ना भाटिया हिच्या नावाची चर्चा...
Tamanna Bhatia: अभिनेत्री तमन्ना भाटिया हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. आजपर्यंत अभिनेत्रीने अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. पण आता अभिनेत्री वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. गुरुवारी अभिनेत्री ईडीकडून चौकशी करण्यात आली. गुरुवारी तमन्ना भाटिया गुवाहाटीमध्ये अंमलबजावणी संचालनालयासमोर (ईडी) चौकशीसाठी हजर झाली. अभिनेत्रीने इंडियन प्रीमियर लीगच्या सामन्यांच्या अवैध स्ट्रीमिंगला प्रोत्साहन दिल्याचे आरोप आहेत. जे महादेव ऑनलाइन जुगार आणि सट्टेबाजी प्लॅटफॉर्मशी संलग्न आहे.
महादेव बॅटिंग ॲपची सहाय्यक कंपनी असलेल्या फेअर प्लेवर आयपीएल सामन्यांचा प्रचार केल्याप्रकरणी ईडी तमन्नाची चौकशी करत आहे. या ॲपद्वारे आयपीएल सामन्यांचे बेकायदेशीर प्रक्षेपण करण्यात आले, त्यामुळे वायाकॉमला एक कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे.
View this post on Instagram
ईडी तमन्नाची चौकशी करत आहे. कारण अभिनेत्रीने ॲपला प्रमोट केलं आहे. सांगायचं झालं तर, याप्रकरणी तमन्ना आरोपी नसल्याचं मानलं जात आहे. अभिनेत्रीने ॲपला प्रमोट का केलं? यामागचं कारण विचारण्यासाठी तमन्ना हिची चौकशी करण्यात आली.
गेल्यावर्षी रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांची झाली चौकशी
सांगायचं झालं तर, अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर यांनी ईडीकडून चौकशीसाठी बोलावण्यात आलं तेव्हा महादेव बॅटिग ॲपचं प्रकरण समोर आली. बेटिंग एक्सचेंज प्लॅटफॉर्म फेअरली प्ले विविध क्रीडा आणि मनोरंजन पर्याय ऑफर करते. हा महादेव ऑनलाइन जुगार ॲपचा एक भाग आहे, जो पत्त्यांचे खेळ, क्रिकेट, पोकर, बॅडमिंटन, टेनिस आणि फुटबॉल यांसारख्या थेट खेळांवर बेकायदेशीर ऑफर देतो. याप्रकरणी अनेक सेलिब्रिटींची नावे देखील समोर आली आहे. आता याप्रकरणी पुढे काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.