AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘अखेर नजर लागली’; तमन्ना भाटिया-विजय वर्मा’चं ब्रेकअप? लग्नाच्या चर्चा सुरु असताना अचानक असं काय घडलं?

तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांच्या अचानक झालेल्या ब्रेकअपने बॉलिवूड आणि त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. या जोडीने त्यांचे प्रेमाचे नाते अगदी खुलेपणाने जगासमोर आणले होते तसेत ते लवकरच लग्न करणार असल्याची चर्चाही होती. पण आता या जोडीचा ब्रेकअप झाल्याची बातमी समोर आली आहे. 

'अखेर नजर लागली'; तमन्ना भाटिया-विजय वर्मा’चं ब्रेकअप? लग्नाच्या चर्चा सुरु असताना अचानक असं काय घडलं?
Follow us
| Updated on: Mar 05, 2025 | 2:51 PM

बॉलिवूड चित्रपटसृष्टीने यापूर्वी अनेक जोडप्यांची प्रेमप्रकरणं गाजली आहेत. काहीचे अफेअर्स चर्चेत राहिले आहेत. पण एक कपल असंही आहे ज्यांची चर्चा साउथपासून ते बॉलिवूडपर्यंत रंगली. आणि या जोडप्याने अगदी मोकळेपणाने आपलं हे नातं सर्वांसमोर कबूल केलं होतं. ते कायम एकमेकांसोबत दिसले. कायम त्यांचे फोटोशूट आणि मुलाखतींमध्ये एकमेकांबद्दल भरभरून बोलले विषय कायम चर्चेत राहिले आहेत.एवढंच नाही तर ही जोडी तेवढीच लोकप्रियही आहे. पण आता बॉलिवूडसह चाहत्यांचेही मन दुखावलं गेलं आहे कारण या लोकप्रिय जोडीचा ब्रेकअप झाला आहे.

तमन्ना भाटिया आणि विजय वर्माच्या ब्रेकअपने चाहतेही दुखावले

ही आवडती जोडी म्हणजे तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा. या दोघांचे नाते कायच चर्चेत राहिलं आहे. त्यांचे एकमेकांवरचे प्रेम पाहता ते लवकरच लग्न करणार असल्याचं ही म्हटलं जात होतं. आणि चाहत्यांचीही तशीच इच्छा होती. नुकत्याच आलेल्या एका रिपोर्टनुसार तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांचे नाते लग्नाच्या उंबरठ्यावर पोहोचण्यापूर्वीच संपल्याचं बोललं जात आहे.

‘अखेर या जोडीला नजर लागलीच’

विजय वर्मा आणि दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटिया त्यांच्या नात्यातील बातम्यांमुळे बऱ्याच काळापासून चर्चेत होते. ज्या पद्धतीने हे दोघे मीडिया कॅमेऱ्यांसमोर दिसले, त्यावरून लोक म्हणायचे की हे नाते नक्कीच लग्नापर्यंत पोहोचेल. पण आता चाहतेही ही बातमी ऐकून हेच कमेंट्स करताना दिसत आहेत की ,’अखेर या जोडीला नजर लागलीच’ असं म्हटलं जात आहे.

कारण एका मुलाखतीतही एकदा विजयला प्रश्न विचारला होता की ते इतक्या सहज आणि मोकळेपणाने सर्वांसमोर त्याचं प्रेम आणि नातं कबूल करतात, त्यांना नजर लागण्याची भिती नाही वाटत का? तेव्हा विजयने सुंदर उत्तर दिलं होतं. तो म्हणाला होता की जिथे विश्वास आहे, प्रेम आहे, आदर आहे आणि ती व्यक्ती माझ्यासाठी काय आहे हे माहित आहे त्यामुळे तिथे भिती कशासाठी बाळगायची. पण शेवटी त्यांचं ब्रेकअप झालं.

तमन्ना आणि विजयच्या एका निकटवर्तीयानेच सांगितली बातमी

एका रिपोर्टनुसार तमन्ना आणि विजय वर्मा यांच्या एका निकटवर्तीयानेच याची पुष्टी केली आहे की या दोघांचं ब्रेकअप झालं आहे. मात्र ना दोघांनी नातं संपल्यावरही त्यांच्यातील मैत्री आणि एकमेकांचा आदर कायम ठेवणार असल्याचं म्हटलं आहे. बाकी त्यांनी आता एकमेकांना डेट करणं थांबवलं आहे. लस्ट स्टोरीज 2 या वेब सीरिजमध्ये या दोघांचा खूपच बोल्ड सीन होता. त्यावर चर्चाही सुरु झाल्या होत्या. ज्यानंतर या दोघांनीही एकमेकांना डेट करत असल्याचं मान्य केलं होतं.

तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा अनेक कार्यक्रमांमध्येही एकत्र दिसायचे. तसंच पापाराझींना फोटोंसाठी पोजही द्यायचे. मात्र आता दोन वर्षांनी या दोघांचं नातं संपुष्टात आल्याची चर्चा रंगली आहे. अर्थात याबाबत तमन्ना किंवा विजय वर्मा कुणीही भाष्य केलेलं नाही. आता हे नातं संपल्याची घोषणा तमन्ना आणि विजय वर्मा याबाबत अधिकृत घोषणा कधी करणार हेच सर्वांना पाहायचं आहे

तमन्ना-विजयने एकत्र फोटो शेअर करणे बंद केले होतं

खरंतर तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांच्या ब्रेकअपचा अंदाज लोकांना खूप आधीपासून आला होता. तमन्ना आणि विजय यांनी इंस्टाग्रामवर एकत्र फोटो शेअर करणे बंद केले होतं, त्यानंतर लोकांनी त्यांच्या नात्याबद्दल प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली होती. कुठेतरी चाहत्यांना अशी कल्पना आली होती की आता त्यांचे मार्ग वेगळे होऊ लागले आहेत, जे आता निश्चित झाले आहे.

पहलगाम हल्ल्यात केंद्रीय सरकारने मान्य केली चूक
पहलगाम हल्ल्यात केंद्रीय सरकारने मान्य केली चूक.
पाणी रोखल्यानं पाकची तडफड का? सिंधू पाणी करार स्थगित, नेमकं काय होणार?
पाणी रोखल्यानं पाकची तडफड का? सिंधू पाणी करार स्थगित, नेमकं काय होणार?.
काश्मीरातून रुपाली ठोंबरे पुण्यात,अंधारेंनी मारली मिठी अन् अश्रू अनावर
काश्मीरातून रुपाली ठोंबरे पुण्यात,अंधारेंनी मारली मिठी अन् अश्रू अनावर.
भारताकडून पाकची कोंडी, तब्बल 20 देशांना..आता पाकिस्तान 'चेकमेट' होणार?
भारताकडून पाकची कोंडी, तब्बल 20 देशांना..आता पाकिस्तान 'चेकमेट' होणार?.
पाकसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित, मोदींचा पाकवर 'कायदेशीर स्ट्राईक'
पाकसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित, मोदींचा पाकवर 'कायदेशीर स्ट्राईक'.
पहलगाम हल्ल्यानंतर देश हळहळला, आता BSF जवान पाकिस्तानात गेला, घडल काय?
पहलगाम हल्ल्यानंतर देश हळहळला, आता BSF जवान पाकिस्तानात गेला, घडल काय?.
पाकच्या उलट्या बोंबा... भारताविरोधात पाकिस्तानं घेतले 'हे' मोठे निर्णय
पाकच्या उलट्या बोंबा... भारताविरोधात पाकिस्तानं घेतले 'हे' मोठे निर्णय.
तर रक्ताचे पाट वाहतील, भारताच्या निर्णयानंतर सईदचा तो व्हिडिओ व्हायरल
तर रक्ताचे पाट वाहतील, भारताच्या निर्णयानंतर सईदचा तो व्हिडिओ व्हायरल.
'जे कधीही विमानात बसले नाही, त्यांना..' नरेश म्हस्केंचं वादग्रस्त वधान
'जे कधीही विमानात बसले नाही, त्यांना..' नरेश म्हस्केंचं वादग्रस्त वधान.
दिल्लीच्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयात केक? पहलगाम हल्ल्याचं दुःख नाही?
दिल्लीच्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयात केक? पहलगाम हल्ल्याचं दुःख नाही?.