प्रसिद्ध अभिनेत्याचं रस्ते अपघातात निधन; धक्कादायक प्रकरणी ‘या’ सेलिब्रिटीला अटक

रस्ते अपघातात प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन, तपासानंतर पोलिसांनी 'या' सेलिब्रिटीला केली अटक... अभिनेत्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर, तर इंडस्ट्रीत शोककळा...

प्रसिद्ध अभिनेत्याचं रस्ते अपघातात निधन; धक्कादायक प्रकरणी 'या' सेलिब्रिटीला अटक
भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठारImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 10, 2023 | 10:44 AM

Saran Raj Passes Away : सहाय्यक दिग्दर्शक आणि सहाय्यक अभिनेता सरन राज याचं एका कार अपघातात निधन झालं आहे. अभिनेत्याच्या निधनाने सर्वत्र खळबळ माजली आहे. केके नगरमध्ये कार अपघातात अभिनेत्याचं निधन झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन अभिनेत्यांची वाहने एकमेकांना धडकल्यामुळे एकाचं जागीच निधन झालं आहे. सहाय्यक अभिनेता पलानीप्पन याची कार सरण राज याच्या बाईकवर धडकल्यामुळे सरणचं निधन झालं आहे.. महत्त्वाचं म्हणजे पलानीप्पन नशेत कार चावत असल्याची माहिती समोर येत आहे. शिवाय पलानीप्पन याला पोलिसांनी अटक केल्याची माहिती देखील समोर येत आहे. अभिनेत्याच्या निधनामुळे इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे.

दिवंगत सरन राज प्रसिद्ध सिनेमा ‘वडा चेन्नई’मध्ये सहाय्यक दिग्दर्शक होता. ‘वडा चेन्नई’ आणि असुरनमध्येही त्याने सहाय्यक भूमिका साकारत चाहत्यांच्या मनात राज्य केले. सरन राज मदुरवोयल येथील धनलक्ष्मी स्ट्रीट येथे राहत होता. रात्री 11.30 वाजता  केके नगरमधील अर्कोट रोडवरून जात असताना हा अपघात झाला.

रिपोर्टनुसार, सरन राज याने हेलमेट घातलं नव्हतं. अशात अपघात झाल्यामुळे अभिनेता गंभीर जखमी झाला होता. धक्कादायक अपघाताची माहिती नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर निरीक्षक अकिला यांच्या नेतृत्वाखाली गिंडी वाहतूक तपास पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर सरन राज याला रॉयपेट्टा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी अभिनेत्याला मृत घोषित केलं.. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

पोलिसांच्या तपासात हा अपघात पलानिप्पनने घडवून आणल्याचं समोर आलं आहे. मद्यधुंद अवस्थेत पलानिप्पन कार चालवत होता. सरन राज याच्या अपघाताप्रकरणी पलानिप्पन याला अटक करण्यात आली आहे. तर दुसरीकडे पोलीस धक्कादायक अपघाताचा अधिक तपास करत आहेत.

अपघातात सरन राज याचं निधन झाल्यामुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. चाहते आणि अभिनेत्याच्या मित्र-परिवाराला देखील मोठा धक्का बसला आहे. अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्याला श्रद्धांजली वाहिली आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.