अवघ्या काही सेकंदांच्या फरकामुळे थोडक्यात बचावला साऊथ सुपरस्टार; शेअर केला भयानक Video

त्या अवघ्या काही सेकंदांचा खेळ कॅमेरात टिपला गेला आहे. विशालने सोशल मीडियावर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे आणि देवाचे आभार मानले आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्याही अंगावर काटा येईल!

अवघ्या काही सेकंदांच्या फरकामुळे थोडक्यात बचावला साऊथ सुपरस्टार; शेअर केला भयानक Video
Vishal Krishna ReddyImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Feb 23, 2023 | 2:26 PM

चेन्नई : चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अनेक घडामोडी घडत असतात. यात अनेकदा ॲक्शन सीन्सचं शूटिंग करताना अपघातही घडतात. ॲक्शन सीन्स शूट करणाऱ्या कलाकारांना दुखापती होतात तर कधी अवघ्या काही सेकंदांच्या फरकाने मोठा अपघात टळतो. अशीच घटना प्रसिद्ध तमिळ अभिनेता आणि निर्माता विशाल कृष्ण रेड्डी याच्यासोबत घडली आहे. विशाल त्याच्या आगामी ‘मार्क अँटनी’ या चित्रपटाचं शूटिंग करत होता, त्यावेळी सेटवर मोठा अपघात घडता घडता वाचला. त्या अवघ्या काही सेकंदांचा खेळ कॅमेरात टिपला गेला आहे. विशालने सोशल मीडियावर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे आणि देवाचे आभार मानले आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्याही अंगावर काटा येईल!

मार्क अँटनीच्या शूटिंगदरम्यान सेटवर कास्ट आणि क्रूची मोठी गर्दी होती. अत्यंत महत्त्वपूर्ण सीनचं शूटिंग सुरू होतं. यावेळी सेटवर ट्रकचा वापर केला गेला. मात्र अचानक ट्रकचालकाचा ताबा सुटला आणि तो वेगाने पुढे निघाला. ज्याठिकाणी एक ज्युनिअर आर्टिस्ट त्याच्या शॉटसाठी उभा होता आणि त्याच्यासोबत विशालसुद्धा होता. त्याच दिशेने हा ट्रक निघाला.

हे सुद्धा वाचा

चित्रपटातील सीनमध्ये, ट्रकला एका भिंतीला तोडून पुढे थांबायचं होतं. मात्र ट्रकचालकाचं नियंत्रण सुटतं आणि तो थांबण्याऐवजी सुसाट पुढे जातो. यामुळे सेटवर गोंधळ निर्माण होतो. सुदैवाने लोकांची नजर त्या ट्रकवर जाते आणि सर्वजण दुसऱ्या दिशेने धावतात. याच घटनेत विशाल बालंबाल बचावतो. काही तांत्रिक बिघाडामुळे ट्रकचालकाचं नियंत्रण सुटल्याची माहिती समोर येत आहे.

पहा व्हिडीओ

विशाल कृष्ण रेड्डीने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर घटनेचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. ‘फक्त काही सेकंदांचा फरक आणि इंचांच्या अंतराने माझा जीव वाचला. मी देवाचे आभार मानतो. या घटनेनंतर मी सुन्न झालो होतो. मात्र आता ठीक आहे आणि पुन्हा शूटिंगला सुरुवात केली आहे’, असं त्याने लिहिलं.

विशालचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहतेसुद्धा थक्क झाले आहेत. विशालचे चाहते त्याचा जीव वाचल्याबद्दल देवाचे आभार मानत आहेत. मार्क अँटनी या चित्रपटाचं दिग्दर्शन अधिक रविचंद्रन करत आहेत. यामध्ये विशालसोबतच रितू वर्मा, अभिनय आणि एसजे सूर्या यांच्या भूमिका आहेत.

विशाल हा प्रसिद्ध चित्रपट निर्माते जीके रेड्डी यांचा मुलगा आहे. विशाल त्याच्या चित्रपटातील जबरदस्त ॲक्शन सीनसाठी ओळखला जातो. त्याचं स्वत:चं प्रॉडक्शन हाऊससुद्धा आहे. त्याचं नाव विशाल फिल्म फॅक्ट्री असं आहे. त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून करिअरची सुरुवात केली. त्यानंतर 2004 मध्ये त्याने अभिनेता म्हणून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.