हाय हिल्समुळे अभिनेत्रीला आरोग्याची गंभीर समस्या; चालताही येईना, व्यक्त केलं दु:ख

प्रसिद्ध अभिनेत्री तनाज इराणीने तिच्या आरोग्याबाबत खुलासा केला आहे. सतत उंच टाचाच्या चपला घातल्यामुळे तिला आरोग्याची समस्या निर्माण झाली, ज्यामुळे ती चालू आणि उभी राहू शकत नव्हती.

हाय हिल्समुळे अभिनेत्रीला आरोग्याची गंभीर समस्या; चालताही येईना, व्यक्त केलं दु:ख
Tanaaz IraniImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 07, 2023 | 9:37 AM

मुंबई | 7 सप्टेंबर 2023 : छोट्या पडद्यापासून बॉलिवूड चित्रपटांपर्यंत आपली वेगळी ओळख निर्माण करणारी प्रसिद्ध अभिनेत्री तनाज इराणीने नुकताच एक धक्कादायक खुलासा केला आहे. आरोग्याशी संबंधित एका गंभीर समस्येचा सामना तिने केला आहे. या कारणामुळे तिच्या करिअरवरही वाईट परिणाम झाला. तनाजने सांगितलं की तिने याबद्दल कोणालाच काही कळू दिलं नाही आणि सोशल मीडियावरही ती व्यक्त झाली नाही. आता ती तिच्या या समस्येबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली आहे. त्याचप्रमाणे तिच्या प्रकृतीबद्दलही अपडेट दिली आहे.

तनाज सध्या सोनी टीव्हीवरील ‘बरसातें- मौसम प्यार का’ या मालिकेत भूमिका साकारत आहे. त्याआधी तिने ‘कहो ना प्यार है’, ‘मेरे यार की शादी है’, ‘दिवानगी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने तिच्या आयुष्यातील कठीण काळाविषयी सांगितलं. तनाजने सांगितलं की काही काळापूर्वी तिच्या पाठीत गंभीर समस्या निर्माण झाली होती. ती म्हणाली, “मला कोणाकडून सहानुभूत नकोय, म्हणून मी हे कोणालाच सांगितलं नाही. त्या परिस्थितीत कोणी माझी मदत करू शकला नसता. म्हणूनच मला कोणाला काहीच सांगायचं नव्हतं.”

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Tannaz Irani (@tannazirani_)

आरोग्याच्या याच समस्येमुळे तनाजने कामातून ब्रेक घेतला होता. “सतत काम आणि उंच टाचाच्या चपला घातल्यामुळे मला L4 आणि L5 स्लिप डिस्कचा त्रास जाणवू लागला होता. माझ्या पाठीत सतत वेदना व्हायच्या. मी चालूसुद्धा शकत नव्हते आणि उभं राहतानाही मला छडीचा सहारा घ्यावा लागत होता. माझ्यासाठी तो फार कठीण काळ होता. सुदैवाने फिजियोथेरेपीच्या मदतीने मी ठीक होऊ शकले आणि आता पुन्हा एकदा काम करू लागले आहे. या कठीण काळात मला माझ्या पतीकडून, मित्रमैत्रिणींकडून आणि कुटुंबीयांकडून खूप साथ मिळाली. त्यांच्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला”, असं तिने सांगितलं.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.