Tandav | वादाचं ‘तांडव’ थांबणार?; वेब सीरिजच्या निर्मात्याची अखेर माफी

'तांडव' या वेब सीरिजमधून हिंदूंच्या भावना दुखावल्यामुळे होत असलेल्या चौफेक टीकेनंतर अखेर 'तांडव'चे निर्माते अली अब्बास जफर यांनी माफी मागितली आहे. ('Tandav' Cast And Crew's "Unconditional Apology" After Complaint In UP)

Tandav | वादाचं 'तांडव' थांबणार?; वेब सीरिजच्या निर्मात्याची अखेर माफी
Follow us
| Updated on: Jan 18, 2021 | 8:43 PM

मुंबई: ‘तांडव’ या वेब सीरिजमधून हिंदूंच्या भावना दुखावल्यामुळे होत असलेल्या चौफेक टीकेनंतर अखेर ‘तांडव’चे निर्माते अली अब्बास जफर यांनी माफी मागितली आहे. ट्विटरवर एक निवेदन जारी करून अली अब्बास जफर यांनी सर्वांची माफी मागितली आहे. (‘Tandav’ Cast And Crew’s “Unconditional Apology” After Complaint In UP)

अली अब्बास जफर यांनी या वेब सीरिजचे दोन मुख्य भाग असल्याचं म्हटलं आहे. पहिला भाग डिस्क्लेमर सारखा आहे. तो सीरिज सुरू होण्यापूर्वी दाखवलेला आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. दुसऱ्या भागात त्यांनी टीकेचा उल्लेख केला आहे. याच भागामुळे वाद निर्माण झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ही वेब सीरिज पाहिल्यानंतर ज्या कुणी आक्षेप घेतला आहे, त्या सर्वांची माफी मागत असल्याचं जफर यांनी म्हटलं आहे. तांडव रिलीज झाल्यानंतर आम्ही प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांवर लक्ष ठेवून होतो. या सीरिजवरून आमची माहिती आणि प्रसारण मंत्रालायशी चर्चा झाली. त्यावेळी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने या सीरिजमुळे जनतेच्या भावना दुखावल्या असून त्यामुळे अनेक केसेस दाखल झाल्याचं आम्हाला सांगितलं.

या वेब सीरिजवर भाजप आणि हिंदू महासभेसह अनेक हिंदू संघटनांनी आक्षेप घेतला होता. या सीरिजमधील काही दृश्यांवर हिंदूत्ववादी संघटनांनी आक्षेप घेतला होता. भाजपचे आमदार राम कदम यांनी ही घाटकोपर पोलीस ठाण्यात सीरिजच्या निर्मात्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. राम कदम यांनी तर अॅमेझॉनच्या प्रॉडक्ट्सवर बहिष्कार घालम्याचं आवाहनही केलं होतं. त्यामुळे अॅमेझॉनवर दबाव वाढला होता. त्यामुळेच जफर यांनी माफी मागितल्याचं सूत्रांनी सांगितलं. बहुजन समाज पार्टीच्या नेत्या मायावती यांनीही या सीरिजमधील आक्षेपार्ह दृश्य वगळण्याची मागणी केली होती. त्यामुळे अॅमेझॉनला त्याची गंभीरपणे दखल घ्यावी लागली होती.

निर्मात्याने काय म्हटलं

ही वेब सीरिज पूर्णपणे फिक्शन आहे. या सीरिजमधील घटनेचा कोणत्याही जिवीत व्यक्ती वा एखाद्या घटनेशी संबंध नाही. असलास तर तो योगायोग समजावा. कोणत्याही व्यक्ती, जाती, समुदाय आणि धार्मिक भावनांना ठेच पोहोचवण्याचा आमचा हेतू नाही. आम्ही सर्व तक्रारी समजून घेतल्या असून कुणाच्या भावना दुखावल्या असल्यास आम्ही सर्वांची विना अट माफी मागत आहोत, असं जफर यांनी म्हटलं आहे.

अॅमेझॉनच्या उत्तराची प्रतिक्षा

जफर यांनी माफी मागितली असली तरी अजूनही अॅमेझॉनवर ही सीरिज दाखवली जात आहे. या सीरिजचे सर्व हक्क अॅमेझॉनकडे आहेत. त्यामुळे सरकार आणि आक्षेप घेणाऱ्यांना उत्तर देण्याची जबाबदारी अॅमेझॉनवर असून अॅमेझॉन काय उत्तर देते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

चुकीला माफी नाही, उपोषण करणार: कदम

दरम्यान, भाजप आमदार राम कदम यांनी केवळ माफी मागून चालणार नाही. आम्ही अॅमेझॉनसहीत सर्वांना तुरुंगात पाठवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा दिला आहे. कदम यांनी तसं ट्विटही केलं आहे. येत्या 19 जानेवारी रोजी आम्ही उपोषणाला बसणार आहोत. जोपर्यंत मुंबई पोलीस एफआयआर दाखल करत नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवू असा इशाराही त्यांनी दिला आहे. (‘Tandav’ Cast And Crew’s “Unconditional Apology” After Complaint In UP)

आजही गुन्हे दाखल

आज दिवसभर तांडव विरोधात विविध शहरांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले. दिल्ली, मुंबई आणि लखनऊमध्ये तांडवच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणी लखनऊ पोलिसांच्या चार अधिकाऱ्यांची एक टीम मुंबईलाही रवाना झाली आहे. उत्तर प्रदेशातील योगी सरकारने हे प्रकरण अतिशय गंभीरपणे घेतलं असल्याचं सूत्रांनी सांगितलं. (‘Tandav’ Cast And Crew’s “Unconditional Apology” After Complaint In UP)

संबंधित बातम्या:

Tandav | वेब सीरीज ‘तांडव’च्या अडचणीत आणखीन वाढ, आता लखनऊमध्ये गुन्हा दाखल!

Dhamaka | कार्तिक आर्यनचा चित्रपट ‘धमाका’ ओटीटीवर प्रदर्शित होणार?

Tandav : राम कदम यांचं पोलीस ठाण्यात ‘तांडव’; वेब सीरिजच्या निर्मात्यांना समन्स पाठवणार

(‘Tandav’ Cast And Crew’s “Unconditional Apology” After Complaint In UP)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.