Tanushree Dutta | नाना पाटेकर यांच्याबद्दल तनुश्री दत्ता म्हणाली, ‘त्यांना आजही माझ्या नावाची…’
Tanushree Dutta | अनेक वर्षांनंतर पुन्हा नाना पाटेकर यांच्याबद्दल तनुश्री दत्ता हिचं मोठं वक्तव्य, सध्या सर्वत्र अभिनेत्रीने केलेल्या वक्तव्याची चर्चा... फक्त नाना पाटेकरच नाही तर, दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्याबद्दल देखील अभिनेत्रीने केलं मोठं वक्तव्य... नक्की काय म्हणाली तनुश्री दत्ता?
मुंबई : 22 सप्टेंबर 2023 | अभिनेत्री राखी सावंत आणि तिचा पती अदिल खान दुर्रानी यांच्यातील वाद आता टोकाला पोहोचले आहेत. दोघांच्या वादामध्ये अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने देखील उडी घेतली आहे. तनुश्री हिने आदिल खान दुर्रानीसोबत पत्रकार परिषद घेतली. यादरम्यान ‘MeToo चळवळ’ सुरु असताना राखी सावंतने तनुश्रीची प्रतिमा खराब केली होती… याबद्दल तनुश्री हिने वक्तव्य केलं. शिवाय पत्रकार परिषदेत ‘MeToo चळवळी’बद्दल बोलत असताना तनुश्री हिने अभिनेता नाना पाटेकर आणि दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्याबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र तनुश्री दत्ता हिने केलेल्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे…
काय म्हणाली तनुश्री दत्ता?
नाना पाटेकर आणि विवेक अग्निहोत्री यांसारख्या लोकांमुळे तिचं करियर बिघडल्याचं तनुश्री कायम म्हणते. मुलाखतीत अभिनेत्रीला एक प्रश्न विचारण्यात आला… ‘ज्या लोकांमुळे तुझं करियर संपलं. ते आजही इंडस्ट्रीमध्ये काम करत आहेत. त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळत आहेत. आता तर नाना पाटेक विवेक अग्निहोत्री यांच्या सिनेमात देखील काम करत आहेत… सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे…’
संबंधित प्रश्नाचं उत्तर देत तनुश्री म्हणाली..
‘आपण नाना पाटेकर आणि तनुश्री दत्ता यांच्याबद्दल का बोलत आहोत. त्यांच्याबद्दल बोलून मला त्यांना प्रसिद्धी द्यायची नाही. आज देखील त्यांना सिनेमा हीट करण्यासाठी माझ्या नावाची गरज भासते. २००८ मध्ये माझं आणि नाना पाटेकर यांचं भांडण झालं होतं. तेव्हा त्यांचा सिनेमा फ्लॉप ठरला. जेव्हा त्यांचे सिनेमे हीट होत नाहीत, तेव्हा माझ्यासारख्या लोकांना अप्रोच करतात. सिनेमांमध्ये एखादं गाणं किंवा पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारण्यासाठी माझ्याकडे येत असतात. म्हणजे त्यांचे सिनेमे हीट होतील… ‘ असं तनुक्षी म्हणाली…
सध्या सर्वत्र तनुश्री दत्ता हिच्या वक्तव्याची चर्चा रंगत आहे. काही वर्षांपूर्वी अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने ‘मी टू’ मोहिमे अंतर्गत नाना पाटेकर आणि इतर सेलिब्रिटींवर गंभीर आरोप केले होते. तिच्यानंतर अनेक क्षेत्रातील महिलांनी देखील त्यांवर झालेले अत्याचार सर्वांना सांगितले… ज्यामुळे तनुश्री तुफान चर्चेत आली होती.
आता तनुश्री सिनेमांपासून दूर असली तरी सोशल मीडियावर मात्र कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ कायम सोशल मीडियावर पोस्ट करत असते.