Rakhi Sawant ला खावी लागणारा तुरुंगाची हवा? ‘या’ अभिनेत्रीमुळे नाना पाटेकर देखील वादाच्या भोवऱ्यात

Rakhi Sawant | 'नाना पाटेकर यांचे अनेक अभिनेत्रींसोबत अफेअर...', 'या' अभिनेत्रीच्या वक्तव्यामुळे नाना पाटेकर अडकणार वादाच्या भोवऱ्यात? राखी हिच्याबद्दल देखील मोठं सत्य समोर... सध्या सर्वत्र राखी सावंत आणि नाना पाटेकर यांच्या खासगी आयुष्याची चर्चा...

Rakhi Sawant ला खावी लागणारा तुरुंगाची हवा? 'या' अभिनेत्रीमुळे नाना पाटेकर देखील वादाच्या भोवऱ्यात
Follow us
| Updated on: Oct 13, 2023 | 12:52 PM

मुंबई | 13 ऑक्टोबर 2023 : बॉलिवूडची ड्रामा क्विन राखी सावंत कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्री वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. फक्त राखी सावंत नाही तर, अभिनेते नाना पाटेकर देखील वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. सध्या सर्वत्र राखी सावंत आणि नाना पाटेकर यांची चर्चा रंगली आहे. अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकर आणि राखी सावंत यांच्यावर निशाणा साधला आहे. तनुश्री दत्ता हिने राखी सावंतवर मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे. एवढंच नाही तर, तनुश्री हिने राखी हिच्या विरोधात तक्रार दाखल केल्याची माहिती देखील मिळत आहे.

तनुश्री हिने नाना पाटेकर यांच्याबद्दलही मोठं वक्तव्य केलं आहे. ‘ते फक्त समाजसेवक असल्याचे भासवतात. पण त्यांचं सत्य फार वेगळं आहे.. असं अभिनेत्री तनुश्री दत्ता म्हणाली. तनुश्री दत्ता हिने 2018 मध्ये मी टू चळवळीदरम्यान राखी सावंतवर मानसिक छळ केल्याचा आरोप करत एफआयआर दाखल केली आहे.

तनुश्री म्हणाली, ‘2018 मध्ये ‘मी टू’ चळवळीदरम्यान राखी सावंत हिच्याकडून झालेल्या मानसिक छळामुळे मी एफआयआर दाखल करण्यासाठी आली आहे. आम्ही राखी हिचे प्रत्येक वक्तव्य रेकॉर्ड केलं आहे. यावेळी तिला क्षमा करणार नाही. आता प्रक्रिया सुरु झाली आहे. लवकरच कारवाई होईल…’ सध्या सर्वत्र तनुश्री दत्ता हिची चर्चा रंगली आहे.

हे सुद्धा वाचा

‘राखी हिच्याकडे चर्चेत राहण्यासाठी प्रत्येक वर्षी नवीन कारण असतं. तिने माझी संपूर्ण प्रतिष्ठा नष्ट केली आहे. ज्याचा परिणाम माझ्या खासगी आयुष्यावर झाला आहे. तिच्यामुळे मी लग्न करु शकली नाही.. गेल्या अनेक दिवसांपासून राखी मला त्रास देत आहे.’ असं देखील तनुश्री दत्ता म्हणाली..

नाना पाटेकर यांच्याबद्दल काय म्हणाली तनुश्री दत्ता?

तनुश्री दत्ता म्हणाली, ‘इंडस्ट्रीमध्ये नाना पाटेकर यांची प्रतिमा चांगली नाही. ते फक्त फोटो आणि व्हिडीओंमध्ये समाजकार्य करताना दिसतात. पण ते अभिनेत्रींसोबत अफेअर करतात. नाना पाटेकर त्यांच्या कुटुंबासोबत राहत नाहीत. सर्वांना माहिती आहे की नाना पाटेकर त्यांचा मुलगा आणि पत्नीसोबत राहत नाहीत…’ असं देखील तनुश्री दत्ता म्हणाली.

तनुश्री दत्ता आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री सोशल मीडियाची मदत घेत असते.

'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.