Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कपूर घराण्याची सून होण्याआधीच तुटलं नातं; रिलेशनशिपमुळे अभिनेत्री चर्चेत

तारा सुतारियाचं आदर जैनशी ब्रेकअप; लग्नापर्यंत पोहोचलेलं नातं अखेर संपुष्टात, नेमकं कुठे बिनसलं?

कपूर घराण्याची सून होण्याआधीच तुटलं नातं; रिलेशनशिपमुळे अभिनेत्री चर्चेत
Tara Sutaria and Aadar JainImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 03, 2023 | 9:46 AM

मुंबई: बॉलिवूड इंडस्ट्रीतील कलाकारांचे चित्रपट जितके चर्चेत असतात, तितकंच त्यांचं वैयक्तिक आयुष्यसुद्धा लाइमलाइटमध्ये असतं. काही सेलिब्रिटींची नाती लग्नापर्यंत पोहोचतात, तर काही जणांचं बऱ्याच वर्षांच्या डेटिंगनंतर ब्रेकअप होतं. बी-टाऊनमधली अशीच एक जोडी ब्रेकअपमुळे चर्चेत आली आहे. ही जोडी आहे तारा सुतारिया आणि आदर जैन यांची. या दोघांनी एकमेकांच्या सहमतीने ब्रेकअप केल्याचं कळतंय. मात्र त्यावर दोघांपैकी कोणाचीच प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.

अनेकदा अशा नात्यांचा शेवट हा कडू असतो. मात्र तारा आणि आदरने त्यांच्या नात्याचा शेवट कडू न करण्याचा निर्णय घेतला. दोघांनी एकमेकांच्या सहमतीने हे ब्रेकअप केल्याचं समजतंय. इतकंच नव्हे तर ब्रेकअपनंतरही एकमेकांचे चांगले मित्र असू, असंही दोघांनी ठरवलं आहे. तारा आणि आदरची जोडी बॉलिवूडमध्ये लोकप्रिय होती.

हे सुद्धा वाचा

तारा सुतारियाने ‘स्टुडंट ऑफ द इअर 2’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर ती ‘मरजावा’ या चित्रपटातही झळकली. कपूर घराण्याच्या अनेक कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये ताराने आदरसोबत हजेरी लावली होती.

View this post on Instagram

A post shared by TARA? (@tarasutaria)

कोण आहे आदर जैन?

आदर जैन हा राज कपूर यांचा नातू आहे. राज कपूर यांची मुलगी रिमा जैन यांचा तो मुलगा आहे. रणबीर कपूर, करीना आणि करिश्मा कपूर यांचा तो चुलत भाऊ आहे. यशराज फिल्म्सच्या बॅनरअंतर्गत तो बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची जोरदार चर्चा होती. त्याने ‘ऐ दिल है मुश्कील’ या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं.

या दोघांचं ब्रेकअप कशामुळे झालं, हे अद्याप स्पष्ट झालं नाही. तारा आणि आदर यांच्या लग्नाच्याही चर्चा होत्या. आलिया आणि रणबीर कपूरच्या लग्नातही ताराने आदरसोबत हजेरी लावली होती.

'हे लोकं दलाल जे मुंडेंना दारू अन् मुली पुरवतात', करूणा शर्मांचा आरोप
'हे लोकं दलाल जे मुंडेंना दारू अन् मुली पुरवतात', करूणा शर्मांचा आरोप.
'त्याला मुंडेंकडून 20 कोटींची ऑफर, मला प्रेमात..', करूणा शर्मांचा दावा
'त्याला मुंडेंकडून 20 कोटींची ऑफर, मला प्रेमात..', करूणा शर्मांचा दावा.
मराठी भाषेचं आंदोलन तूर्तास थांबवा पण.., राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश
मराठी भाषेचं आंदोलन तूर्तास थांबवा पण.., राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश.
'...म्हणून अमित ठाकरे हरले', उबाठा प्रवक्त्यानं सांगितलं पराभवाचं कारण
'...म्हणून अमित ठाकरे हरले', उबाठा प्रवक्त्यानं सांगितलं पराभवाचं कारण.
'घबराए नही, हम मराठी सिखाएंगे', ठाकरे गटाकडून बॅनरबाजीतून मनसेला उत्तर
'घबराए नही, हम मराठी सिखाएंगे', ठाकरे गटाकडून बॅनरबाजीतून मनसेला उत्तर.
करूणा शर्मा या मुंडेंच्या पत्नी आहे की नाही?; कोर्टात आज काय घडणार?
करूणा शर्मा या मुंडेंच्या पत्नी आहे की नाही?; कोर्टात आज काय घडणार?.
पुण्यातील गर्भवती मृत्यू प्रकरणानंतर प्रशासनाचा मोठा निर्णय, यापुढे...
पुण्यातील गर्भवती मृत्यू प्रकरणानंतर प्रशासनाचा मोठा निर्णय, यापुढे....
'बॉम्ब घरात टाकून..', खोक्याला मारहाणीनंतर धमकी, वकिलांनी काय सांगितले
'बॉम्ब घरात टाकून..', खोक्याला मारहाणीनंतर धमकी, वकिलांनी काय सांगितले.
मुंबईकरांनो…लोकलनं प्रवास करताय? बघा उद्या कोणत्या मार्गावर मेगाब्लॉक?
मुंबईकरांनो…लोकलनं प्रवास करताय? बघा उद्या कोणत्या मार्गावर मेगाब्लॉक?.
'मग तुझ्या राज ठाकरेला सांगतो', मनसे नेता अन् सदावर्तेंमध्ये बाचाबाची
'मग तुझ्या राज ठाकरेला सांगतो', मनसे नेता अन् सदावर्तेंमध्ये बाचाबाची.