‘कर्मा इज ***’; मैत्रिणीशीच एक्स बॉयफ्रेंडच्या साखरपुड्यानंतर अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत
आपलीच खास मैत्री आलेख अडवाणीशी एक्स बॉयफ्रेंडने साखरपुडा केल्यानंतर अभिनेत्री तारा सुतारियाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. यामध्ये एक पुस्तक पहायला मिळत असून त्याच्या नावानेच नेटकऱ्यांचं लक्ष वेधलंय.
राज कपूर यांचा नातू आणि रणबीर, करिश्मा, करीना यांचा चुलत भाऊ आदर जैन याचा नुकताच रोका पार पडला. मुंबईत पार पडलेल्या या कार्यक्रमाला कपूर कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते. आदरने गर्लफ्रेंड आलेखा अडवाणीशी साखरपुडा केला. याआधी तो अभिनेत्री तारा सुतारियाला डेट करत होता. या दोघांच्या लग्नाच्याही चर्चा होत्या. मात्र त्याआधीच त्यांचं ब्रेकअप झालं. ब्रेकअपनंतर आदर हा ताराचीच मैत्रीण आलेखाला डेट करू लागला. आता या दोघांच्या साखरपुड्यादरम्यान ताराची एक पोस्ट सोशल मीडियावर तुफान चर्चेत आली आहे. शनिवारीच आदर आणि आलेखाचा रोका पार पडला आणि शनिवारीच ताराने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये ही पोस्ट लिहिली आहे.
ताराने इन्स्टा स्टोरीमध्ये एका पुस्तकाचा फोटो शेअर केला आहे. त्यावर तिने लिहिलं, ‘शोमेमाकचं नवं पुस्तक मी नुकतंच घेतलंय ‘कर्मा इज अ बीच’. हे पुस्तक वाचण्यासाठी मी खूपच उत्सुक आहे. तुम्हीसुद्धा ॲमेझॉनवरून हे पुस्तक खरेदी करू शकता.’ या पोस्टमधील पुस्तकाच्या नावावरून नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. आदरच्याच साखरपुड्याच्या दिवशी ताराने कर्माबद्दलचं हे पुस्तक शेअर केल्याने तिने अप्रत्यक्षपणे त्याला टोमणा मारल्याचं म्हटलं जात आहे. आलेखा अडवाणी ही तारा आणि आदर यांची खास मैत्रीण होती. तारासोबतच्या ब्रेकअपनंतर आदरने आलेखाला लग्नासाठी प्रपोज केलं.
Tara Sutaria’s read on Adar Jain’s roka day seems like a warning. 🤣 byu/arpabecrazy inBollyBlindsNGossip
हे सुद्धा वाचा
तारा आणि आदर यांनी 2020 मध्ये नात्याची जाहीर कबुली दिली होती. त्याच्या आधीपासूनच दोघं एकमेकांना डेट करत होते. ताराला अनेकदा कपूर कुटुंबीयांच्या कार्यक्रमात आदरसोबत पाहिलं गेलं. इतकंच काय तर या दोघांच्या लग्नाच्याही चर्चा होत्या. मात्र त्याआधीच त्यांचा ब्रेकअप झाला. ताराने ‘स्टुडंट ऑफ द इअर 2’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तर दुसरीकडे आलेखा अडवाणी ही ‘वे वेल’ या मुंबईतील कम्युनिटीची संस्थापिका आहे. या कम्युनिटीअंतर्गत वेलनेस इव्हेंट्स, वर्कशॉप्स, सेशन्स आणि रिट्रीट्स आयोजित केले जातात.