तारक मेहता मालिकेत सोढीची भूमिका साकारणारा अभिनेता गुरुचरण सिंग हा बेपत्ता झालाय. 22 एप्रिल 2024 रोजी अभिनेता बेपत्ता झाला असून पोलिस त्याच्या शोधात आहेत. आता गुरुचरण सिंग बेपत्ता होऊन इतके दिवस झाले आहेत. मात्र, अभिनेत्याबद्दल अजून काहीही माहिती मिळत नाहीये. या प्रकरणात पोलिस तपास करत आहेत. गुरुचरण सिंग हा 22 एप्रिलला आपल्या घरातून मुंबईला जात असल्याचे सांगून बाहेर पडला. मात्र, तो विमानतळापर्यंत पोहचलाच नाही. दिल्लीच्या पालम परिसरातील एका सीसीटीव्हीमध्ये गुरुचरण सिंग हा कैद झाला. पोलिसांच्या हाती अजून या प्रकरणात काहीच लागले नाहीये.
गुरुचरण सिंग बेपत्ता झाल्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसलाय. हेच नाही तर गुरुचरण सिंग हा आर्थिक तंगीत सापडल्याचे देखील सातत्याने सांगितले जातंय. गुरुचरण सिंगने 2020 मध्ये तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका सोडली. गुरुचरण सिंग हा सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतं. गुरुचरण सिंगची मोठा चाहता वर्ग आहे.
आता गुरुचरण सिंग हा बेपत्ता झाल्यानंतर गुरुचरण सिंग याचे वडील हरगीत सिंग यांनी मोठा खुलासा केलाय. गुरुचरण सिंग हा बेपत्ता होण्याच्या एकदिवस अगोदर घरात कसे वातावरण होते आणि काय घडले, याबद्दलच सांगताना गुरुचरण सिंगचे वडील दिसले आहेत. हरगीत सिंग यांनी नुकताच एक मुलाखत दिलीये.
हरगीत सिंग म्हणाले की, काही खास सेलिब्रेशन नव्हते. आम्ही सर्वजण एकत्र असल्याने खूप चांगले वाटले. दुसऱ्या दिवशी तो मुंबईला जाणार होता. जे काही होते ते आमच्यासाठी अत्यंत हैराण करणारे नक्कीच आहे. आम्हाला काहीच कळत नाहीये की, जे काही सुरू आहे त्याला कसे सामोरे जावे. आम्ही सर्वचजण खूप जास्त त्रस्त आहोत.
एकंदरीतच काय तर गुरुचरण सिंग बेपत्ता होण्याच्या आदल्यादिवशी घरात कसे वातावरण होते आणि काय घडले, याबद्दलच सांगताना गुरुचरण सिंगचे वडील दिसले आहेत. याचाच अर्थ की, गुरुचरण सिंग हा घरातून बाहेर पडण्याच्या अगोदर सर्वकाही एकदम व्यवस्थित होते. गुरुचरण सिंग याच्यासाठी सतत प्रार्थना केल्या जात आहेत. गुरुचरण सिंग बेपत्ता झाल्यानंतर तारक मेहता मालिकेतील कलाकारांनाही मोठा धक्का बसलाय.