TMKOC: ‘त्यांनी मला शांत राहण्यासाठी…’ रीटा रिपोर्टरचे असित मोदी यांच्यावर गंभीर आरोप
जेनिफर मिस्त्री हिच्यानंतर रीटा रिपोर्टरने आसित मोदी यांच्यावर केले धक्कादायक आरोप; म्हणाली, 'लैंगिक अत्याचाराबद्दल...', सध्या सर्वत्र प्रिया हिची चर्चा
मुंबई | 28 जुलै 2023 : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (tarak mehta ka ooltah chashmah) ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून चाहत्यांचं मनोरंजन करत आहे. प्रेक्षकांना पोट धरुन हासवणारी मालिका गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. मालिकेतील अनेक सेलिब्रिटींनी निर्माते असित मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले होते. मालिकेत रिटा रिपोर्टरची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रिया आहुजा राजदा देखील निर्मात्यांवर सतत आरोप करत आहे. प्रियाने अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीने असित मोदींवर लावलेल्या आरोपांशी संबंधित आणखी एक मोठा खुलासा केला आहे.
प्रियाने एक दोन नाही तर तब्बल १४ वर्ष मालिकेत काम केलं. पण या प्रवासात अभिनेत्रीला अनेक चढ – उतारांचा सामना करावा लागला. जवळपास आठ महिने मालिकेपासून दूर राहिल्यानंतर अभिनेत्रीने असित मोदी आणि टीमला मेसेज पाठवण्याचा निर्णय घेतला. मात्र, अभिनेत्रीला राजीनाम्यावरही प्रतिसाद मिळाला नसल्याचं प्रियाने सांगितले.
आता अभिनेत्रीने अतिस मोदी यांच्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. प्रिया म्हणाली, ‘मला एक कॉल आला होता. तेव्हा जेनिफर प्रकरणावर काहीही बोलू नकोस असं मला सांगण्यात आलं. पण आता बोलण्याची गरज आहे. त्या घटनेपूर्वी मी नेहमी गप्प राहिली आणि कधीच काही बोलली नाही.’
पुढे प्रिया म्हणाली, ‘जेनिफर चुकीची नव्हती. त्यामुळे मला तिची बाजू घेतली पाहिजे. मला लैंगिक अत्याचाराबद्दल काहीही माहिती नाही.पण मला माहीत होतं की जेनिफर ही वाईट वागणारी व्यक्ती नाही. तसेच, कलाकारांना अशी वागणूक देऊन ते कसे सुटू शकतात? ‘ असा प्रश्न देखील प्रिया हिने उपस्थित केला.
जेनिफर हिने असित मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले होते. ज्यामुळे जेनिफर तुफान चर्चेत आली होती. पण अद्यापही ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ वादाच्या भोवऱ्यात आहे. सध्या सर्वत्र ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेची चर्चा रंगली आहे. मालिकेला २८ जुलै २०२३ म्हणजे १५ वर्ष पूर्ण झाली आहेत.
१५ वर्षांच्या मालिकेच्या प्रवासात अनेक चढ – उतार आले. अनेक कलाकारांनी मालिकेचा निरोप घेतला. तर अनेकांनी निर्माते असित मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले. पण गेल्या काही दिवसांपासून मालिकेत दयाबेन पुन्हा येणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. यामुळे मालिकेत आणि चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. मालिका गेल्या अनेक वर्षांपासून चाहत्यांचं मनोरंजन करत आहे. मालिकेतील प्रत्येक भूमिकेला चाहते प्रेम देतात.