खिशात फक्त 400 रू घेऊन आलेला चहावाला बनला लखपती; KBC च्या मंचावर अमिताभ यांच्याकडूनही कौतुक
अमिताभ बच्चन यांचा शो 'कौन बनेगा करोडपतीमध्ये प्रत्येकजण आपलं नशीब आजमवायला येत. अशाच एका स्पर्धकाची जो की एक चहाविक्रेता आहे त्याने आपल्या बुद्धीच्या जोरावर चक्क 25 लाख जिंकले.
अमिताभ बच्चन यांचा शो ‘कौन बनेगा करोडपती 16’ची चर्चा सध्या सर्वत्र आहे. केबीसी हे एक असे व्यासपीठ आहे जिथे प्रत्येक व्यक्ती ज्ञानाच्या जोरावर हॉट सीटवर येऊन बसते. KBC च्या मंचाने आजवर अनेकांचे नशीब पालटले आहे. अशीच एक चर्चा होतेय एका स्पर्धकाची ज्याने अमिताभ यांनीही तोंडभरून कौतुक केलं आहे.
KBC ने नशीबच पालटले
अमिताभ बच्चन यांचा शो ‘कौन बनेगा करोडपती 16’ असा शो आहे की कोणाचे नशीब कधी बदलेल हे कोणालाच कळत नाही. असे अनेक स्पर्धक या शोमध्ये आले आणि त्यांचे नशीब बदलले. नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये असेच काहीसे घडताना दिसले. एका चहा व्यावसायिकाने आपलं नशीब आजमावलं आहे. या चहाव्यावसायिकाने त्याच्या ज्ञानाच्या जोरावर 25 लाख जिंकले आहेत.
सुरुवातीला घाबरलेल्या मिंटू सरकारने अमिताभ बच्चन यांच्या प्रोत्साहनाने आणि ज्ञान आणि लवचिकता दोन्ही दाखवून 10,000 जिंकले. त्यांनी प्रेक्षक पोल देखील वापरला आणि मगध राज्याबद्दलच्या प्रश्नाचे उत्तर देत 40,000 जिंकले
आपल्या हुशारीने जिकंले 25 लाख
जसजसा खेळ पुढे सरकत गेला, तसतसा मिंटू जिंकत राहिला आणि आयएनएस विक्रांतच्या बोधवाक्याबद्दलच्या प्रश्नाचे अचूक उत्तर देऊन मग त्याने 12,50,000 जिंकले. त्यानंतर प्रश्न आला तो 25 लाखांसाठी, त्याने रामायणाशी संबंधितील एका प्रश्नाचे उत्तर देत अखेर 25 लाख जिंकले.
मिंटूचा खेळ उत्तम सुरु होता पण पुढे एका प्रश्नाच्या उत्तराबद्दल त्याला खात्री नव्हती त्यामुळे त्याला त्याने 50 लाखांवर खेळ सोडण्याचा निर्णय घेतला त्यामुळे त्याने एकूण 25 लाख मिळवले.
महिन्याला फक्त 3000 कमावणारा चहावाला आज लखपती
या स्पर्धकाचे नाव आहे मिंटू सरकार. KBC साठी पश्चिम बंगालमधील रायगंज येथून आला होता. त्याच्या चहा विक्रिचा व्यवसाय आहे. तो फक्त 10वी पास आहे पण त्याला बऱ्याच गोष्टींचे ज्ञान आहे, त्याला पुस्तके वाचण्याची आवड आहे. त्याच्या जोरावर त्याने बऱ्याच गोष्टींविषयी ज्ञान मिळवलं आहे. मिंटूच्या कामाबद्दल सांगायचे तर, तो चहाचे दुकान चालवतो ज्यामुळे त्याचे घर चालण्यास मदत होते. त्याची कमाई महिन्याला फक्त 3000 रुपये आहे आणि जेव्हा तो KBC च्या मंचावर आला तेव्हा त्याच्या खात्यातही फक्त 400 रुपये होते.
View this post on Instagram
मिंटू सरकारने KBC मंचावर सुरुवातीपासूनच प्रश्नांची उत्तरे देत तो तब्बल 25 लाखांपर्यंत येऊन पोहोचला होता. 25 लाखांसाठी जो प्रश्न विचारण्यात आला होता तो रामायणाशी संबंधित होता. त्याने या प्रश्नाचे अगदी योग्य उत्तर देत 25 लाख जिंकला. अमिताभ बच्चन यांनी देखील त्याचे खूप कौतुक केले. पश्चिम बंगालमधून आलेल्या मिंटू सरकारने या शोमध्ये आपला चांगला खेळ दाखवला.