Tejas teaser | भारत को छेड़ोगे, तो छोड़ेंगे नहीं… कंगनाच्या ‘तेजस’चा जबरदस्त टीझर पाहिलात का?

अभिनेत्री कंगना रनौतच्या आगामी 'तेजस' या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यामध्ये कंगना फायटर पायलच्या भूमिकेत असून चित्रपटाच्या टीझरला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळतोय. येत्या 27 ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Tejas teaser | भारत को छेड़ोगे, तो छोड़ेंगे नहीं... कंगनाच्या 'तेजस'चा जबरदस्त टीझर पाहिलात का?
Tejas TeaserImage Credit source: Youtube
Follow us
| Updated on: Oct 02, 2023 | 1:49 PM

मुंबई | 2 ऑक्टोबर 2023 : बॉलिवूडची क्वीन अर्थात अभिनेत्री कंगना रनौतचा ‘चंद्रमुखी 2’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. अशातच कंगनाच्या आणखी एका चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘तेजस’ असं तिच्या या आगामी चित्रपटाचं नाव असून यामध्ये कंगनाचा दमदार अंदाज पहायला मिळतोय. यामध्ये कंगनाने फायटर पायलटची भूमिका साकारली आहे. येत्या 27 ऑक्टोबर रोजी हा बहुप्रतिक्षित चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार असून यामध्ये कंगना तेजस गिलच्या भूमिकेत आहे.

कंगनाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर ‘तेजस’चा टीझर पोस्ट केला आहे. या टीझरच्या सुरुवातीलाच एअरफोर्स प्लेन दाखवला जातो. त्यानंतर कंगना तिच्या युनिफॉर्ममध्ये समोर येते. “जरुरी नहीं की हर बार बातचित होनी चाहिए. जंग के मैदान में अब जंग होनी चाहिए. की हो गया मेरे वतन पर अब बहुत ही सितम, अब तो आकाश से बारिश नहीं आग बरसनी चाहिए”, असा दमदार डायलॉग टीझरमध्ये ऐकायला मिळतो. कंगनाच्या तोंडी असलेला ‘भारत को छेडोगे तो छोडेंगे नहीं’ या डायलॉगनेही प्रेक्षकांचं लक्ष वेधलंय. हा टीझर शेअर करत कंगनाने कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘आपल्या देशाच्या प्रेमासाठी उड्डाण करायला सज्ज आहे. येत्या 8 ऑक्टोबर रोजी इंडियन एअरफोर्स दिवसानिमित्त याचा ट्रेलर प्रदर्शित होईल.’

हे सुद्धा वाचा

पहा टीझर

कंगनाच्या या चित्रपटाच्या टीझरचं नेटकऱ्यांकडून कौतुक होत आहे. ‘अंगावर काटा आला’, असं एकाने लिहिलं. तर ‘हा ब्लॉकबस्टर चित्रपट असेल’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘लोक तिचा तिरस्कार करू शकतात, पण कंगनाच्या प्रतिभेकडे दुर्लक्ष करता येणार नाही’, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी तिचं कौतुक केलंय. कंगनाच्या ‘तेजस’ या चित्रपटाचं दिग्दर्शन सर्वेश मेवाडाने केलंय. यामध्ये कंगनासोबतच वरुण मित्राची मुख्य भूमिका आहे. एअरफोर्स पायलट तेजस गिलच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे.

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.