तेजश्री प्रधानने अजून जपून ठेवलंय तिचं ‘ते’ मंगळसूत्र; म्हणाली, “माझ्या आयुष्यातली पहिली …”
तेजश्री प्रधानने तिच एक मंगळसूत्र आजही जपून ठेवलं असल्याचं एका मुलाखतीत सांगितलं. दरम्यान हे मंगळसुत्र जपून ठेवण्यामागे एक खास कारण असल्याचंही तिने म्हटलं. पण ते कारण जाणून घेतल्यानंतर तिच्या त्या मंगळसुत्रासोबत खास भावना जोडल्या असल्याचंही तिने सांगितलं.
अभिनेत्री तेजश्री प्रधान प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री आहे. तिने अनेक मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात तिचं खास स्थान निर्माण केलं आहे. पण प्रेक्षकांच्या मनावर सर्वात जास्त छाप पाडणारी मालिका म्हणजे ‘होणार सून मी ह्या घरची’.तेजश्रीची ही मालिका प्रचंड गाजली होती. जान्हवी आणि श्री या दोन्ही पात्रांनी प्रेक्षकांना आपलंसं केलं होतं.
मालिकेतील पात्राप्रमाणे जान्हवी मंगळसूत्रही प्रसिद्ध
या मालिकेतील जान्हवी हे पात्र इतकं प्रसिद्ध आणि सर्वांच्या आवडीचे झाले होते की तेजश्रीने मालिकेत घातलेल्या साड्या, ड्रेस, एवढचं काय तिने घातलेलं तीन पदरी मंगळसूत्रही प्रसिद्ध झालं होतं. जान्हवी मंगळसूत्र या नावानेच ते प्रसिद्ध झालं होतं.
जान्हवीचं मंगळसूत्राला महिलांची इतकी पसंती मिळाली होती की अनेक महिलांनी तसं मंगळसूत्र घालण्यास सुरुवात केली होती. एवढच नाही तर बाजारातही अशा पद्धतीच्या मंगळसुत्रांना प्रचंड मागणी होती.
हे मंगळसुत्र फक्त चाहत्यांनाच आवडलं होतं असं नाही तर स्वत: जानव्ही म्हणजेच हे पात्र साकारणाऱ्या तेजश्रीचंही हे फेव्हरेट होतं. तेजश्रीने आजही हे मंगळसूत्र स्वत:जवळ जपून ठेवलं आहे. तिने यामगचं एक खास कारणही सांगितलं आहे. एका मुलाखतीदरम्यान तेजश्रीने ‘होणार सून मी ह्या घरची’ मालिकेतील मंगळसूत्र जपून ठेवल्याचा खुलासा केला.
View this post on Instagram
मंगळसूत्र जपून ठेवण्याचं खास कारण
तिने मंगळसूत्र जपून ठेवण्याचं खास कारण सांगितलं आहे. ती म्हणाली की, “‘मी होणार सून मी ह्या घरची’ मालिका करत होते, तेव्हा जान्हवीचं मंगळसूत्र खूप लोकप्रिय झालं होतं. अफाट लोकप्रियता त्या मंगळसूत्राला मिळालीये. आजही कुठल्याही ज्वेलरी शॉपमध्ये गेलं तरी त्याबद्दल बोललं जातं. त्यामुळे ते मंगळसूत्र खूप लोकप्रिय झाल्याने ते माझ्याकडे ठेवायचं असं मी ठरवलं. कारण माझ्या आयुष्यातली पहिली लोकप्रिय झालेली ही गोष्ट होती. त्यामुळे मी या मालिकेतील मंगळसूत्र जपून ठेवलंय.” असं म्हणत तिने त्या मंगळसूत्रासोबत तिच्या भावना जोडल्या असल्याचं स्पष्ट केलं.
दरम्यान तेजश्रीचा ‘हॅशटॅग तदेव लग्नम’हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून, या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. तसेच तेजश्री मराठीसह हिंदीत काम करत आहे. काही दिवसांपूर्वी तिच्या ‘दर्मियान’ नावाच्या चित्रपटाची स्क्रिनिंग झाली. मणिकर्णिका आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात तेजश्रीचा हा चित्रपट दाखवण्यात आला होता.