मुंबई | 28 जुलै 2023 : अभिनेत्री तेजस्वी प्रधान हिने आतापर्यंत अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. ‘होणार सून सून मी ह्या घरची’, ‘अग्गं बाई सासू बाई’ यांसारख्या अनेक मालिकांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत तेजस्वी चाहत्यांच्या भेटीस आली. शिवाय ‘ती सध्या काय करते’, ‘झेंडा’ यांसारख्या हीट सिनेमांमध्ये देखील तेजस्वी मुख्य भूमिकेत दिसली. आता पुन्हा तेजस्वी टेलिव्हीजनवर दमदार कमबॅक करण्यासाठी सज्ज झाली आहे. म्हणून चाहते देखील तेजस्वी हिला नव्या मालिकेत पाहण्यासाठी उत्सुक आहेत. सध्या सर्वत्र तेजस्वी हिच्या नव्या मालिकेची चर्चा रंगत आहे.
स्टार प्रवाहच्या नव्या मालिकेतून एका नव्या अंदाजात तेजश्री प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत तिची नेमकी कोणती भूमिका असणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र हे नवं पात्र साकारण्यासाठी तेजश्री प्रचंड उत्सुक आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या नव्या मालिकेची चर्चा रंगत आहे.
नव्या मलिकेबद्दल तेजस्वी म्हणाली, ‘मी ठरवून एक प्रोजेक्ट संपल्यानंतर काही काळ दिसणं टाळते. देवकृपेने प्रेक्षक माझ्या नव्या प्रोजेक्टची आतुरतेने वाट पहात असतात. जसं घरातली एखादी व्यक्ती कामानिमित्ताने बाहेर गेली की घरातले तिच्या वाटेकडे डोळे लावून बसेलेले असतात. अगदी तसाच अनुभव एक कलाकार म्हणून मीही घेतलाय. गेले कित्येक दिवस पुन्हा कधी भेटीला येणार याविषयी विचारणा होत होती.’ असं अभिनेत्री म्हणाली.
मालिकेतील अभिनेत्रीच्या भूमिकेबद्दल कळलं नसलं तरी अभिनेत्री सकारात्मक भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा रंगत आहे. ‘मला सकारात्मक भूमिका साकारायला आवडतं. माझी नवी भूमिका देखील सकारात्मकच असेल.’ असं देखील तेजस्वी म्हणाली. शिवाय नव्या मालिकेच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या नंबर वन वाहिनीसोबत पुन्हा एकदा जोडली जातेय याचा आनंद आहे. असं देखील अभिनेत्री म्हणाली.
तेजस्वीने सोशल मीडियावर नवीन व्हिडीओ देखील पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये अभिनेत्री नव्या मालिकेबद्दल सांगताना दिसत आहे. पण अभिनेत्री मलिकेचं नाव आणि तिच्या भूमिकेबद्दल काहीही सांगितलं नाही. म्हणून चाहत्यांच्या मनातील उत्सुकता आणखी वाढली आहे. सध्या अभिनेत्री पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
तेजस्वीने सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. तेजस्वी कायम तिच्या नव्या प्रोजेक्टबद्दल सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना सांगत असते. आता देखील अभिनेत्रीने पोस्ट केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.