Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Duniyadari: ‘दुनियादारी’च्या वेळी असं काय घडलं ज्यामुळे ‘या’ अभिनेत्रीला करावा लागला मोठा त्याग…

'दुनियादारी' सिनेमाच्या शुटिंगला सुरुवात होणार म्हणून तिने लग्नाची मेंहदी देखील हातावर काढली नाही; पण शेवटच्या क्षणाला असं काय झालं ज्यामुळे 'या' अभिनेत्रीला करावा लागला मोठा त्याग...

Duniyadari: 'दुनियादारी'च्या वेळी असं काय घडलं ज्यामुळे 'या' अभिनेत्रीला करावा लागला मोठा त्याग...
Follow us
| Updated on: Jul 19, 2023 | 9:36 AM

मुंबई | 19 जुलै 2023 : ‘हातात क्याटबरी असताना समोर आलेलं बिस्कीट सुद्धा तुला सोडवत नाही…बच्चूच आहेस तू….’ अशा एकापेक्षा एक डायलॉगमुळे ‘दुनियादारी’ सिनेमाचा आनंद प्रेक्षकांनी घेता आला. आज ‘दुनियादारी’ सिनेमाला १० वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यामुळे जुन्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या… महत्त्वाचं म्हणजे काही सिनेमे कधीही विसरता येत नाहीत, अशाच सिनेमांपैकी एक म्हणजे ‘दुनियादारी’ सिनेमा. ‘दुनियादारी’ सिनेमाने फक्त बॉक्स ऑफिसवर नाही तर, चाहत्यांच्या मनावर देखील राज्य केलं… अभिनेता स्वप्निल जोशी याला सतत बच्चू म्हणून हाक मारणारी अभिनेत्री सई ताम्हणकर… म्हणजे ‘दुनियादारी’ सिनेमातील शिरीन..

सिनेमात शिरीनच्या भूमिकेतून चाहत्यांच्या भेटीस सई ताम्हणकर आली. पण तिच्याआधी मराठी सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्रीला शिरीन ही भूमिका ऑफर करण्यात आली होती. पण शेवटच्या क्षण असं काही झालं ज्यामुळे सई सिनेमात मुख्य भूमिकेत दिसली. सर्वप्रथम शिरीन ही भूमिका अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिला ऑफर करण्यात आली होती.

तेजस्विनी पंडित हिने सिनेमातून अचानक बाहेर झाल्यानंतर मनातील खंत देखील व्यक्त करुन दाखली, अभिनेत्री म्हणाली, ‘जे तुमच्या नशिबात लिहिलेलं असेल. ती गोष्ट तुम्हाला मिळतेच. पण जी गोष्ट तुमच्या नशिबात नसेल आणि त्यासाठी तु्म्ही प्रयत्न करत असाल तर ती गोष्ट तुम्हाला मिळणार नाही..’

दुनियादारी सिनेमाबद्दल अभिनेत्री म्हणली, ‘दुनियादारी सिनेमा माझा होता. शिरीनची भूमिका माझी होती. माझं १६ तारखेला लग्न होतं आणि २० तारखेपासून शुटिंग सुरु होणार होती. संजयदादानं सांगितलं होतं मेंदी काढायची नाही. सिनेमासाठी मी हातावर मेंहदी देखील काढली नव्हती. पण जेव्हा सकाळी बाबांनी पेपरमध्ये दुनियादारी सिनेमाबद्दल बातमी वाचली तेव्हा बातमीत माझं नाव नव्हतं…’

‘मी सगळ्यांना फोन केला. पण कोणीच नीट उत्तर दिलं नाही. मला आजही माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नाही. अखेर मी सईला फोन केला. तिला देखील काहीही कल्पना नव्हती.. मी आणि सई एकमेकांच्या घनिष्ठ मैत्रिणी आहोत. त्यामुळे आम्ही दोघींनी समजून घेतलं. आमच्यात गैरसमज झाले नाहीत…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.

तेजस्विनी पंडित हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, ती देखील एक कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. सिनेमा, मालिका, वेबसीरिज अशा मनोरंजनाच्या विविध माध्यमांमधून तेजस्विनी हटके भूमिकांमधून प्रेक्षकांच्या समोर आली. सोशल मीडियावर देखील अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

ठाकरेंची सेना सिल्व्हर ओकच्या कचराकुंडीत..., शिवसेनेच्या नेत्याची टीका
ठाकरेंची सेना सिल्व्हर ओकच्या कचराकुंडीत..., शिवसेनेच्या नेत्याची टीका.
जागरण गोंधळातील जेवणातून 79 जणांना विषबाधा
जागरण गोंधळातील जेवणातून 79 जणांना विषबाधा.
‘तुम मराठी लोग गंदा...’, मुंबईत पुन्हा मराठी माणसाचा अपमान, घडलं काय?
‘तुम मराठी लोग गंदा...’, मुंबईत पुन्हा मराठी माणसाचा अपमान, घडलं काय?.
धनंजय मुंडेंचा शिरूर कासारचा दौरा रद्द, ट्विट करून दिली माहिती
धनंजय मुंडेंचा शिरूर कासारचा दौरा रद्द, ट्विट करून दिली माहिती.
'शिंदेंना त्या विमानातून उतरवलंय, आता ते ट्रेनचे....', राऊतांनी डिवचलं
'शिंदेंना त्या विमानातून उतरवलंय, आता ते ट्रेनचे....', राऊतांनी डिवचलं.
'जो बिरोबाचा नाही झाला..', संभाजी ब्रिगेडकडून पडळकरांवर पलटवार
'जो बिरोबाचा नाही झाला..', संभाजी ब्रिगेडकडून पडळकरांवर पलटवार.
पहिल्यांदाच धस-मुंडे एकत्र, नामदेव शास्त्री एकाच वाक्यात म्हणाले...
पहिल्यांदाच धस-मुंडे एकत्र, नामदेव शास्त्री एकाच वाक्यात म्हणाले....
बेडकासारख्या उड्या मारत आलेले आम्हाला शिकवणार का?
बेडकासारख्या उड्या मारत आलेले आम्हाला शिकवणार का?.
बारमध्ये डान्स अन् हातात रायफल... PSI रणजीत कासलेंचा व्हिडीओ व्हायरल
बारमध्ये डान्स अन् हातात रायफल... PSI रणजीत कासलेंचा व्हिडीओ व्हायरल.
मालवणच्या राजकोटवरचा शिवरायांचा नवा पुतळा कसा असणार? कधी होणार अनावरण?
मालवणच्या राजकोटवरचा शिवरायांचा नवा पुतळा कसा असणार? कधी होणार अनावरण?.