जेसिकामुळे वाढतेय यश आणि नेहामधली जवळीक, नेहा देणार प्रेमाची कबुली
जेसिकाच्या येण्यामुळे नेहा सध्या अस्वस्थ आहे. जेसिका आणि यश यांचं जवळ येणं नेहाला त्रास देतंय आणि हळूहळू नेहाच्या मनातलं यशवरचं प्रेम दिसू लागलंय.
आयेशा सय्यद, मुंबई : झी मराठीवरच्या ( Zee Marathi) माझी तुझी रेशीमगाठ (Majhi Tuzi Reshimgath) ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीला उतरतेय. या मालिकेत आता एक वेगळाच ट्विस्ट येणार आहे. इतक्या दिवस नेहा (Neha) यशवर (Yash) असलेलं प्रेम लपवत होती. पण आता नेहाला ते लपवणं शक्य होत नाहीये. हळूहळू तिचं यशवरचं तिचं प्रेम दिसू लागलंय. त्याचं कारण ठरलंय यशची एक्स गर्लफ्रेंड बनून आलेली जेसिका (Jesilka). जेसिकाच्या येण्यामुळे नेहा सध्या अस्वस्थ आहे. जेसिका आणि यश यांचं जवळ येणं नेहाला त्रास देतंय आणि हळूहळू नेहाच्या मनातलं यशवरचं प्रेम दिसू लागलंय.याची जाणिव यशलाही होतेय. ज्याने हा सगळा बनाव रचलाय त्या समीरलाही या सगळ्यामुळे आनंद होतोय. कारण यश आणि नेहा जवळ येण्यासाठीच त्याने हे सगळं घडवून आणलं आहे.
नेहा यशवरच्या प्रेमाचा इजहार करणार
जेसिकाच्या येण्यामुळे नेहा सध्या अस्वस्थ आहे. जेसिका आणि यश यांचं जवळ येणं नेहाला त्रास देतंय आणि हळूहळू नेहाच्या मनातलं यशवरचं प्रेम दिसू लागलंय. त्यामुळे लवकरच नेहा यशसमोर आल्या प्रेमाचा इजहार करणार आहे, असं दिसतंय.
नेहाला यशवरच्या प्रेमाची जाणिव व्हावी म्हणून समीरने यशची एक्स गर्लफ्रेंड म्हणून जेसिकाला आणलं आहे. तिच्या येण्याने नेहाला आपल्या प्रेमाची जाणिव होईल, असं यशला वाटत होतं आणि तसंच घडताना दिसतंय.
View this post on Instagram
माझी तुझी रेशीमगाठ
झी मराठीवरची माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीला उतरतेय. अनेकांना ही मालिका आपलीशी वाटतेय. या मालिकेतील नेहाचा खरेपणा आणि यशचा साधेपणा प्रेक्षकांना आवडतोय. मालिकेतील परीही अनेकांना आवडतेय. तिचे डायलॉग तिचे हावभाव प्रेक्षकांचं मन जिंकून घेत आहेत.
संबंधित बातम्या