95 वर्षीय भक्ताची ‘योगयोगेश्वर जय शंकर’ मालिकेच्या सेटला भेट; बाल शंकराला पाहताच मारली मिठी
सोलापूरच्या (Solapur) रघुनाथ हरिभाऊ कडलास्कर (पेंटर काका) यांना वयाच्या तिसऱ्या - चौथ्या वर्षांपासून ते वयाच्या वीस वर्षांपर्यंत शंकर महाराजांचा प्रत्यक्ष सहवास लाभला. महाराजांच्या कृपाशीर्वादाने त्यांचं आयुष्य भक्तिमय झालं.
कलर्स मराठी (Colors Marathi) वाहिनीवर नवीनच सुरू झालेल्या ‘योगयोगेश्वर जय शंकर’ (Yogyogeshwar Jai Shankar) या मालिकेद्वारे सदगुरू श्री शंकर महाराज यांचा जीवन प्रवास उलगडून दाखवला जात आहे. श्री शंकर महाराज यांच्या बालपणापासूनच श्री स्वामी समर्थांचा त्यांच्यावर कृपाशीर्वाद होता, तसाच कृपाशीर्वाद शंकर महाराजांचा त्यांच्या भक्तांवर आहे. त्यापैकीच एक भक्त म्हणजे सोलापूरच्या (Solapur) रघुनाथ हरिभाऊ कडलास्कर (पेंटर काका) यांना वयाच्या तिसऱ्या – चौथ्या वर्षांपासून ते वयाच्या वीस वर्षांपर्यंत शंकर महाराजांचा प्रत्यक्ष सहवास लाभला. महाराजांच्या कृपाशीर्वादाने त्यांचं आयुष्य भक्तिमय झालं. 1947 मध्ये धनकवडी इथं महाराजांनी समाधी घेतली. त्यावेळी पेंटर काकांचं वय वीस वर्षे होतं. आज पेंटर काका 95 वर्षांचे असून त्यांनी नुकतीच मालिकेच्या सेटला भेट दिली.
‘योगयोगेश्वर जय शंकर’ ही मालिका कलर्स मराठी वाहिनीवर प्रसारित होत असल्याचं समजताच त्यांना आनंद झाला आणि बालशंकराच्या भूमिकेत आरुषला पाहून त्यांना गहिवरून आलं. मालिकेतील बाल शंकरला पाहून त्यांना पुन्हा एकदा सदगुरू श्री शंकर महाराज यांच्या प्रत्यक्ष भेटीची ओढ लागली. 95 वर्षांचे पेंटर काका ताबडतोब मुलगा विजूदादा कडलास्कर यांच्यासह सोलापूरवरून कलर्स मराठीच्या योगयोगेश्वर जय शंकर मालिकेच्या नाशिक इथल्या सेटवर बालशंकरला भेटण्यासाठी आले. काकांच्या या भेटीतून त्यांचं शंकर महाराजांवर असलेलं अफाट प्रेम दिसून आलं.
इन्स्टा पोस्ट-
View this post on Instagram
मालिकेच्या सेटवर पेंटर काकांनी बाल शंकरला पाहताच क्षणी मिठीत घेतलं. महाराजांचा पुन्हा एकदा सहवास लाभला असे उद्गार त्यांनी यावेळी काढले. यावेळी पेंटर काकांनी महाजनांविषयी प्रत्यक्ष भेटीचे काही अनुभव सर्वांना सांगितले. विजूदादा यांनीही शंकर महाराज आणि भस्मे काका ,मधुबुवा, जक्कल काका, प्रधान , आशर ,गिरमे काका यांच्या आणि पेंटर काकांच्या यांच्या समोर घडलेल्या महाराजांच्या चमत्कारातून घडलेल्या आध्यत्मिक गोष्टी सांगितल्या. काका आणि बालशंकर यांची भेट पाहून सेटवरील सर्व कलाकार आणि संपूर्ण टीमलाही विलक्षण आनंद झाला.