Aai Kuthe Kay Karte | ‘मी देशमुख कुटुंबाला सोडणार नाही…!’, ऐन लग्नाच्या मुहूर्तावर संजनाचा देशमुख कुटुंबियांना अल्टीमेटम!

छोट्या पडद्यावरील बहुचर्चित आणि लोकप्रिय मालिका म्हणजे स्टार प्रवाह वरील ‘आई कुठे काय करते’(Aai Kuthe Kay Karte). या मालिकेने घराघरांत आणि प्रेक्षकांच्या मनामनात स्थान मिळवले आहे. या वेळी ही मालिका टीआरपी शर्यतीतही अव्वल क्रमांकावर आहे.

Aai Kuthe Kay Karte | ‘मी देशमुख कुटुंबाला सोडणार नाही...!’, ऐन लग्नाच्या मुहूर्तावर संजनाचा देशमुख कुटुंबियांना अल्टीमेटम!
आई कुठे काय करते
Follow us
| Updated on: Aug 30, 2021 | 1:48 PM

मुंबई : छोट्या पडद्यावरील बहुचर्चित आणि लोकप्रिय मालिका म्हणजे स्टार प्रवाह वरील ‘आई कुठे काय करते’(Aai Kuthe Kay Karte). या मालिकेने घराघरांत आणि प्रेक्षकांच्या मनामनात स्थान मिळवले आहे. या वेळी ही मालिका टीआरपी शर्यतीतही अव्वल क्रमांकावर आहे. सध्या मालिकेत अनेक नवी वळणे येत असून, मालिका अतिशय मनोरंजक झाली आहे. मालिकेत सध्या अनिरुद्ध देशमुख आणि संजना याच्या लग्नाचा ट्रॅक सुरु आहे. मात्र आता या महत्वाच्या मुहूर्तावर देखील एक नवा हंगामा दिसणार आहे.

‘आई कुठे काय करते’ या मालिकेत आता अनिरुद्ध आणि अरुंधतीचा घटस्फोट झाला आहे. या नंतर आता संजनाने देखील शेखरपासून घटस्फोट मिळवला आहे. यानंतर ती घाईनेच अनिरुद्धसोबत लग्नाच्या मागे लागली आहे. मात्र, अनिरुधच्या मनात यावेळी देखील लग्नाचा विचार नाहीये आणि तो शक्यतो ते टाळण्याचा प्रयत्न करत आहे.

संजनाचा जळफळाट

अरुंधतीला पुन्हा समृद्धी बंगल्यात आलीये हे ऐकून संजना प्रचंड संतापली आहे. या दरम्यान तिने अनिरुद्धचा भाऊ अविनाश याच्यावर देखील घर हडपण्यासाठी आलायस असे आरोप केले. तर दुसरीकडे तिचा देखील घटस्फोट झाल्याने आता संजना लग्नासाठी अनिरुद्धशी लग्नाची तयारी करत आहे. त्यातच अरुंधती घरी आली आणि घटस्फोटानंतरही अनिरुद्धचा तिच्याकडे वाढता झुकाव बघता संजनाला खूप असुरक्षित वाटू लागलं आहे. त्यामुळे आजारी अरुंधती घरी आल्यावर संजनाने लगेचच लग्नाचा घाट घातला आहे.

अनिरुद्ध पुन्हा होणार गायब!

नुकत्याच नव्या प्रोमोमध्ये संजना अनिरुद्धच्या घरातील लोकांना कारवाईची धमकी देताना दिसली होती. खरंतर शस्त्रक्रियेनंतर अरुंधतीला देशमुख कुटुंबाने पुन्हा घरी आणले आहे. हे पाहून संजना चिडली आहे. याचमुळे चिडलेल्या संजनाने लगेच लग्न करण्याचा घाट घातला आहे. या योजनेनुसार तिने अवघ्या दोन दिवसांत त्यांच्या लग्नाची संपूर्ण तयारी केली. मात्र, ऐन लग्नाच्या मुहूर्तावर पुन्हा एकदा अनिरुद्ध गायब झाला आहे. अनिरुद्ध कुठे आणि का गेलाय याबाबत कोणालाही माहिती नाहीये.

संजनाचा देशमुख कुटुंबियांना अल्टीमेटम!

अनिरुद्ध पुन्हा गायब झालेला पाहून संजना प्रचंड संतापली आहे. यावेळी तिने समृद्धी बंगल्यात येऊन तमाशा केला आहे. संजनाने अनिरुद्धला फितवल्याचा आरोप अरुंधतीवर केला आहे. तूच अनिरुद्धला माझ्या विरोधात भडकवलंस आणि त्याला कुठेतरी पाठवलंस असा आरोप तिने अरुंधतीवर केला आहे. तसेच जर अनिरुद्ध आला नाही आणि आमचं लग्न झालं नाही तर मी संपूर्ण देशमुख कुटुंबाला सोडणार नाही, त्यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार करेन, अशी धमकी देखील तिने यावेळी दिली आहे. मात्र, देशमुखांना देखील अनिरुद्ध कुठे गेला आहे? आणि का गेला आहे, याबद्दल काहीही माहिती नाहीये. तर, दुसरीकडे यावेळी तरी संजना आणि अनिरुद्धचं लग्न होणार की नाही, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे.

हेही वाचा :

सिद्धार्थ मल्होत्रानं म्हणतो, अभिनेता नसतो तर सैनिक झालो असतो!

‘शेवटी समर सारख्या नराधमाच्या चेहऱ्याला चिखल फासलाच…’, ‘पाहिले न मी तुला!’ बद्दल शशांक केतकरनं व्यक्त केल्या भावना

इंटिमेट सीन देताना जॅकी श्रॉफला अवघडल्यासारखं का होतं?, म्हणाले- बरेच लोक तुम्हाला बघत असतात!

'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार.
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी.
'त्याला भाजप संपवतो...म्हणून शिंदे अन् दादांची नार्को टेस्ट करा'- कडू
'त्याला भाजप संपवतो...म्हणून शिंदे अन् दादांची नार्को टेस्ट करा'- कडू.
मतदारांचा अपमान,संजय गायकवाडांची घसरली जीभ तर अजितदादांचीही उर्मट भाषा
मतदारांचा अपमान,संजय गायकवाडांची घसरली जीभ तर अजितदादांचीही उर्मट भाषा.
2 कोटींच्या खंडणीची डील थेट मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर? धसांचा आरोप
2 कोटींच्या खंडणीची डील थेट मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर? धसांचा आरोप.
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.