Aai Kuthe Kay Karte: ‘आई कुठे काय करते’च्या शूटिंगदरम्यान रुपाली भोसलेला दुखापत

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेत संजनाची (Sanjana) भूमिका साकारणारी अभिनेत्री रुपाली भोसलेला (Rupali Bhosle) सेटवर शूटिंगदरम्यान दुखापत झाली. खुद्द रुपालीनेच याबद्दलची माहिती दिली.

Aai Kuthe Kay Karte: 'आई कुठे काय करते'च्या शूटिंगदरम्यान रुपाली भोसलेला दुखापत
Rupali BhosleImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 19, 2022 | 4:36 PM

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेत संजनाची (Sanjana) भूमिका साकारणारी अभिनेत्री रुपाली भोसलेला (Rupali Bhosle) सेटवर शूटिंगदरम्यान दुखापत झाली. खुद्द रुपालीनेच याबद्दलची माहिती दिली. शूटिंग सुरू असताना एका सीनदरम्यान रुपालीच्या पायाच्या अंगठ्याला दुखापत झाली. वेदना होत असताना काम करणं कठीण जात असल्याचं तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं. सध्या मालिकेत संजनाने कटकारस्थान रचत देशमुखांचं घर आपल्या नावे करून घेतलं आहे. मात्र ही बाब जेव्हा अरुंधती आणि देशमुखांना समजली, तेव्हा सर्वचजण तिच्या विरोधात उभे राहिले. आपल्या कुटुंबीयांवर प्रेम करणाऱ्या अनिरुद्धलाही संजनाच्या या वागण्याने मोठा धक्का बसला आहे. अशा वेळी रागाच्या भरात अनिरुद्ध संजनाला घटस्फोट देण्याचा विचार करतो. अनिरुद्ध संजनाला ओरडतानाचा हा सीन होता. याच सीनदरम्यान रुपालीला ही दुखापत झाली.

‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत रुपालीने सांगितलं, “मी मिलिंद गवळी (अनिरुद्ध) यांच्यासोबत शूटिंग करत होते. मालिकेच्या कथेनुसार अनिरुद्ध हा संजनाला घटस्फोट देण्याचा विचार करतो आणि तिच्यावर ओरडतो. संजना रडत रडत खुर्चीवर बसते असा तो सीन होता. आमचे दिग्दर्शक रवी यांनी मला खुर्चीवर बसण्यास सांगितलं होतं. पण खुर्चीवर बसण्यावर खाली जमिनीवर बसणं योग्य वाटेल असं मला वाटलं. नंतर दिग्दर्शकांनाही ही कल्पना पटली आणि आम्ही शूटिंग सुरू केलं. शूटिंग सुरू असताना मी रडत आवेषाने जमिनीवर बसले असता माझ्या पायाचा अंगठा मुरगळला आणि त्याचं नख पूर्णपणे बाहेर आलं. मला असह्य वेदना होत असल्याने अखेर मी तो सीन तिथेच थांबवला.”

इन्स्टा पोस्ट-

शूटिंग सेटच्या जवळ डॉक्टर नसल्याने रुपालीला त्यावर उपचार घेता आले नाही. “आम्ही कालच डॉक्टरांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण रविवार असल्याने डॉक्टरांकडून उपचार घेणं शक्य झालं नाही. मला होत असलेल्या वेदना मी शब्दातही मांडू शकत नाही. पण त्यासाठी मी शूटिंग थांबवलं नाही. अंगठ्याला जखम झाली असताना काम करणं कठीण जातंय. पण विशेष भागाचं शूटिंग असल्याचं मला काम करणं भाग आहे”, असं तिने पुढे सांगितलं.

हेही वाचा:

“हे समीकरण ज्यांना कळत नाही तिथेच..”; 11 लाखांच्या पैठणीवरून ट्रोल करणाऱ्यांना आदेश बांदेकरांचं सडेतोड उत्तर

KGF: रेकॉर्डब्रेक कमाई करणाऱ्या KGF च्या खऱ्या खाणीची कहाणी; जिथून निघालं होतं तब्बल 900 टन सोनं

पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.