अरुंधतीने स्पष्टपणे सांगितली तिची बाजू; प्रेमाची कबुली दिल्याचा आशुतोषला होणार पश्चात्ताप?

स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेतील गेल्या दोन एपिसोड्समध्ये प्रेक्षकांना हाय व्होल्टेज ड्रामा पहायला मिळाला. आशुतोषच्या तोंडून प्रेमाची कबुली ऐकल्यानंतर अरुंधतीला मोठा धक्का बसला आहे.

अरुंधतीने स्पष्टपणे सांगितली तिची बाजू; प्रेमाची कबुली दिल्याचा आशुतोषला होणार पश्चात्ताप?
Aai Kuthe Kay KarteImage Credit source: Hotstar
Follow us
| Updated on: Mar 10, 2022 | 2:53 PM

स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेतील गेल्या दोन एपिसोड्समध्ये प्रेक्षकांना हाय व्होल्टेज ड्रामा पहायला मिळाला. आधी अभिषेकचं बेताल बोलणं ऐकून अरुंधतीने (Arundhati) त्याच्या कानशिलात लगावली. अभिषेकने अरुंधतीचा केलेला अपमान आशुतोषला सहन झाला नाही. देशमुख कुटुंबीयांसमोर आशुतोष आणि अनिरुद्ध यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. याचदरम्यान आशुतोष अरुंधतीवरील त्याच्या प्रेमाची कबुली देतो. हे सर्व अरुंधती आणि यश दाराबाहेर उभे राहून ऐकतात. आशुतोषच्या तोंडून प्रेमाची कबुली ऐकल्यानंतर अरुंधतीला मोठा धक्का बसला आहे. या सर्व घडामोडींनंतरही यशने समजावून सांगितल्यानंतर ती आशुतोषसमोर तिची बाजू स्पष्टपणे मांडायला जाते. पण यामुळे आशुतोषला प्रेमाची कबुली दिल्याचा मोठा पश्चात्ताप होणार का, त्याच्या आणि अरुंधतीच्या मैत्रीत अडथळा निर्माण होणार का, हे प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागात पहायला मिळेल.

“आयुष्यभर अरुंधती माझ्यावर कधीच प्रेम करू शकणार नाही, हे मला माहित असूनही मी तिची साथ सोडणार नाही. कारण तिची मैत्री माझ्याकरिता मोलाची आहे. आमच्यात निळख मैत्री आहे आणि ती तशीच राहील. आमच्या मैत्रीवर शिंतोडे उडवू नकोस”, अशा शब्दांत आशुतोष अनिरुद्धला सुनावतो. ‘अरुंधतीचं दुसऱ्यावर प्रेम असलेलं मला चालणार नाही’, याच आविर्भावात अनिरुद्ध असतो. एकीकडे आशुतोषच्या तोंडून प्रेमाची कबुली ऐकल्यानंतर अनिरुद्ध अस्वस्थ होतो, तर दुसरीकडे अरुंधतीलाही तिचे विचार स्वस्थ बसू देत नाहीत.

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

देशमुख कुटुंबीयांसमोर अशा पद्धतीने अरुंधतीवरील प्रेमाविषयी बोलायला पाहिजे नव्हतं, असं आशुतोषला वाटतं. आईसमोर तो त्याचा पश्चात्ताप व्यक्त करतो. तर अरुंधतीच्या समजूतदारपणावर विश्वास ठेवण्याचा सल्ला त्याची आई देते. दुसरीकडे अरुंधतीच्या मनात विचारांचं द्वंद्व सुरू आहे. तरीसुद्धा ती आशुतोषशी स्पष्ट बोलण्याचा निर्णय घेते. “माझ्या मनात असं काही नाहीये. मी फक्त अनिरुद्धवर प्रेम केलंय. बाकी मैत्री, एकत्र काम याबद्दल माझं काहीही म्हणणं नाहीये. पण त्याहून जास्त मला गुंतता नाही येणार,” असं ती स्पष्ट करते. अरुंधतीच्या या स्पष्टीकरणाचा तिच्या आणि आशुतोषमधील मैत्रीवर काय परिणाम होणार, हे प्रेक्षकांना मालिकेच्या पुढील भागात पहायला मिळेल.

हेही वाचा:

लेखक नशा करून, गांजा मारून लिहितात का? ट्रोलिंगवर ‘आई कुठे काय करते’च्या लेखिकेचा परखड सवाल

आई कुठे काय करते: देशमुखांसमोर आशुतोष देणार प्रेमाची कबुली; काय असेल अरुंधतीची प्रतिक्रिया?

अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.