Aai Kuthe Kay Karte | अनिरुद्ध देशमुखशी घटस्फोटानंतर ‘आई’ बदलणार? नव्या फोटोंमुळे चर्चांना उधाण!

छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) आता एका वेगळ्या टप्प्यावर पोहोचली आहे. मालिकेत आता आई-बाबा अर्थात अनिरुद्ध आणि अरुंधती देशमुख यांचा घटस्फोट झाला आहे. कायदेशीररित्या एकमेकांपासून फारकत घेऊन आता हे दोघे वेगळे झाले आहेत.

Aai Kuthe Kay Karte | अनिरुद्ध देशमुखशी घटस्फोटानंतर ‘आई’ बदलणार? नव्या फोटोंमुळे चर्चांना उधाण!
Aai Kuthe Kay karte
Follow us
| Updated on: Aug 07, 2021 | 1:46 PM

मुंबई : छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) आता एका वेगळ्या टप्प्यावर पोहोचली आहे. मालिकेत आता आई-बाबा अर्थात अनिरुद्ध आणि अरुंधती देशमुख यांचा घटस्फोट झाला आहे. कायदेशीररित्या एकमेकांपासून फारकत घेऊन आता हे दोघे वेगळे झाले आहेत. अनिरुद्धला घटस्फोट देण्याबरोबरच अरुंधतीने आता देशमुखांच्या घराचा देखील निरोप घेतला आहे.

घटस्फोटाच्या दिवशी आपलं सगळं सामान आवरून, 25 वर्षातील संसाराच्या आठवणी मागे सोडून अरुंधती आता पुढील आयुष्यातील तिच्या नव्या प्रवासाला सज्ज झाली आहे. ‘समृद्धी’ आठवणींची शिदोरी सोबत घेऊन आता आई पुन्हा एकदा तिच्या माहेरी निघाली आहे. मात्र, आता मालिकेत अरुंधतीचा लूक बदलणार असल्याची चर्चा होत आहे.

काय होतेय नव्या लूकची चर्चा?

मालिकेत एकीकडे अनिरुद्ध-अरुंधतीचा घटस्फोट दाखवला जात आहे, तर दुसरीकडे ‘अरुंधती’ साकारणाऱ्या मधुराणी प्रभुलकर हिने सोशल मीडियावर नवा लूक शेअर केला आहे. या लूकमध्ये मधुराणी अतिशय शॉर्ट केसांसह नव्या लूकमध्ये दिसत आहे. या फोटोंमुळे सोशल मीडियावर अरुंधतीच्या बदलत्या लूकची चर्चा होत आहे.

पाहा अरुंधतीची पोस्ट :

मालिकेत सध्या काय सुरु आहे?

‘आई कुठे काय करते’ या मालिकेत सध्या यशच्या साखरपुड्याचा सोहळा सुरु होता. या आनंदाच्या निमित्ताने घरातील सार्वजण एकत्र जमले होते. इतकेच नाही तर, 15 वर्षांपासून दूर असलेला अनिरुद्धचा भाऊ अविनाश देखील ‘समृद्धी’ बंगल्यात परतला आहे. घरात एकीकडे आनंदाचा सोहळा सुरु असताना मात्र, दुसरीकडे अनिरुद्धला वकिलांचा फोन येतो आणि घटस्फोटाची तारीख मिळाल्याचे सांगतो. एकीकडे उत्साह ओसंडून वाहत असताना, दुसरीकडे या वाईट बातमीने संपूर्ण देशमुख कुटुंब हादरून जात. मात्र, या वेळीही अरुंधती आपल्या निर्णयावर ठाम होती आणि अखेर तिने अनिरुद्धला घटस्फोट दिला.

अरुंधतीला पाहून आई देखील दुःखी!

अनिरुद्धशी काडीमोड घेत, समृद्धीचा निरोप घेऊन अरुंधती आता आपल्या आईच्या घरी अर्थात माहेरी निघाली आहे. अरुंधती आता आपली आई आणि भाऊ यांच्यासोबत त्यांच्या डोंबिवलीच्या घरात राहणार आहे. आपल्या मुलीचा 25 वर्षांचा भरला संसार मोडताना पाहून अरुंधतीच्या आईला देखील दुःख झालं. आपल्या मुलीची ही अवस्था पाहून आई देखील पूर्णपणे कोलमडून गेली होती.

जेवणाच्या ताटावर अरुंधतीच्या आईने आपल्या मुलीच्या दुःखाने अश्रू ढाळले. नुकताच अम्लीकेचा नवा प्रोमो समोर आला असून, यात माय-लेकींमधील हा भावनिक बंध पाहून प्रेक्षकांच्या डोळ्यातही पाणी आले आहे. या व्हिडीओत आई अरुंधतीला म्हणाली की, ’25 वर्षांचा संसार, पदरात 3 मुलं असताना कोण असं म्हणू शकतं की, माझं तुझ्यावर प्रेम नाही?’ यावर अरुंधती आईला म्हणते,’ आई असं भरल्या ताटावर रडू नये.’ आपल्याला जेवण जाणार नाही आता असे आई म्हणताच अरुंधती प्रेमाने आईला घास भरवते. मालिकेतील हे भावनिक दृश्य पहाताना सर्वांच्याच डोळ्यांच्या कडा पाणवतात.

(Aai Kuthe Kay Karte Arundhati gets a new look after divorce)

हेही वाचा :

अद्वैत दादरकर म्हणतोय ‘सोहम कुलकर्णी मला तुझी आठवण येईल…’, ‘अग्गंबाई सूनबाई’ अल्पावधीतच प्रेक्षकांचा निरोप घेणार!

‘कमिंग बॅक होम वाली फीलिंग’, ‘फुलपाखरू’ फेम हृता दुर्गुळेचं पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पुनरागमन!

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.