Aai Kuthe Kay Karte : म्हातारी सुटलीय आज, कांचनबाईच्या सासुगिरीवर संजनाच्या मनात उकळ्या, देशमुखांच्या घरात राडाच राडा
Aai Kuthe Kay Karte : देशमुख कुटुंबात एक मोठा बदल पहायला मिळणार आहे. अनिरुद्धचे वडील आप्पा देखील अरूंधतीच्या घरी राहायला जाणार आहेत. हे सगळं पाहून संजनाच्या मनात मात्र उकळ्या फुटत आहेत.
मुंबई : आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay) या मालिकेत काय घडतं, काय बिघडतं याकडे सर्वाचं लक्ष असतं.या मालिकेत सध्या अरुंधती (Arundhati) घर सोडून गेली आणि ती स्वतंत्र राहू लागली आहे. अरुंधतीने आपलं स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने पहिलं पाऊल उचललं आहे. अरुंधतीचं ‘सुखाचे चांदणे’ (Sukhache Chandane) हा म्युझिक अल्बम लाँच सोहळा मालिकेत नुकताच पार पडला. मात्र अश्यातच आता अरुंधती आणि कांचनमध्ये वाद झालाय. त्यामुळे एक मोठा बदल देशमुख कुटुंबात पहायला मिळणार आहे. अनिरुद्धचे वडील अप्पादेखील (Appa) अरूंधतीच्या घरी राहायला जाणार आहेत. हे सगळं पाहून संजनाच्या मनात मात्र उकळ्या फुटत आहेत. त्यामुळे म्हातारी आज चांगलीच सुटलीय, असं नेटकरी म्हणताना पाहायला मिळत आहेत.
देशमुखांच्या घरात वादळ
आई कुठे काय करते मालिकेतील अरुंधती आणि कांचनमध्ये वाद झालाय. त्यामुळे एक मोठा बदल देशमुख कुटुंबात पहायला मिळणार आहे. अनिरुद्धचे वडील आप्पा देखील अरूंधतीच्या घरी राहायला जाणार आहेत. याचा प्रोमो स्टार प्रवाहने शेअर केलाय. कांचन म्हणते, “अरुंधतीने बायको म्हणून या घरावरचा हक्क सोडायला नको होता. पण ती सगळ्याला लाथ मारून निघून गेली. म्हणून अरूंधतीचं कधीही भलं होणार नाही, असं अनिरूद्ध बोलला”, असं कांचन म्हणाली. यावेळी अरुंधती दारात उभी असते कांचनचं लक्ष तिच्याकडे जातं. अरुंधतीच्या डोळ्यात पाणी आल्याचं पाहायला मिळतं. तितक्यात अप्पा पुढे येतात आणि” इथून पुढे जर तू अरुंधीला काही बोललीस तर मी तुला घराबेहर काढेन”, असं कांचनला म्हणतात. त्यावर या घरातून बाहेर काढणारे तुम्ही कोण? हा बंगला अनिरूद्धने उभा केल्याचं कांचन म्हणते. त्यावर अप्पा अरुंधतीला मी तुझ्यासोबत येतो, असं म्हणतात आणि दोघे घराबाहेर पडतात… हे सगळं तुम्हाला आजच्या भागात पाहायला मिळणार आहे.
View this post on Instagram
‘आई कुठे काय करते’ या मालिकेचं कथानक आता उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. या घडलेल्या घटनेनंतर आता या मालिकेत काय पाहायला मिळणार? मालिकेत कोणता ट्विस्ट येणार, ते पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
View this post on Instagram
संबंधित बातम्या